AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News | विद्यार्थ्यांच्या निकालात चुका, प्रथमच केली गेली अनेक प्राध्यापकांवर कारवाई

Pune Education News | विद्यार्थ्यांचा निकाल लावताना अनेक वेळा शिक्षक, प्राध्यापकांकडून चुका केल्या जातात. कधी प्रश्न न तपासणे तर कधी गुणांची बेरीज बरोबर नसते. आता हा हलगर्जीपणा प्राध्यापकांना चांगलाच भोवला आहे.

Pune News | विद्यार्थ्यांच्या निकालात चुका, प्रथमच केली गेली अनेक प्राध्यापकांवर कारवाई
Pune-UniversityImage Credit source: socialmedia
| Updated on: Oct 05, 2023 | 8:36 AM
Share

अभिजित पोते, पुणे | 5 ऑक्टोंबर 2023 : वर्षभर अभ्यास करुन विद्यार्थी परीक्षा देतो. परंतु अनेक वेळा निकाल चुकीची लागतो. यामुळे विद्यार्थी पुन्हा शुल्क भरुन पेपरच्या पुनर्तपासणीचा अर्ज करतो. त्यात प्राध्यपकांकडून झालेला घोळ स्पष्ट होता. आता पेपर तपासणी करताना केलेल्या चुकांसंदर्भात विद्यापीठाने कठोर भूमिका घेतली आहे. पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून प्राध्यापक आणि महाविद्यालयांवर कारवाई करण्यात आली. प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने प्राध्यापकांवर कारवाईचा बडगा उचलला आहे.

किती महाविद्यालयांवर कारवाई

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने निकाल चुकविणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई सुरु केली आहे. विद्यापीठाने ७८ महाविद्यालयांना दंड केला आहे. विद्यार्थ्यांचे निकाल चुकवणाऱ्या प्राध्यापक आणि महाविद्यालयांवर प्रथमच कारवाई करण्यात आलेली आहे. विद्यापीठाकडून एप्रिल- मे २०२३ या सत्रातील परीक्षांचे निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यात अनेक विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण भरण्याचे राहून गेल्याचे समोर आले. तसेच काही जणांनी चुकीचे गुण दिले. तर काहींकडून गुण भरण्यात त्रुटी राहून गेल्या. त्यामुळे विद्यापीठाच्या समितीकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणी सुनावणी घेऊन संबंधित प्राध्यापकांवर कारवाई करण्यात आली.

किती रुपयांचा केला दंड

विविध विषयांच्या परीक्षांचे अंतर्गत गुण आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण देतानाही प्राध्यापकांनी चुका केल्याचे चौकशी समितीला दिसून आले. त्यानंतर विद्यापीठाच्या समितीने ७८ महाविद्यालयातील प्राध्यापकांना पाच हजार रुपयांपर्यंतचा दंड केला आहे. विद्यापीठाच्या समितीने दिलेल्या शिक्षेची महाविद्यालयाने योग्य ती पूर्तता करावी. तसेच यासंदर्भातील कार्यवाहीचा पूर्तता अहवाल परीक्षा विभागास सादर करावा, असे आदेश विद्यापीठाने दिले आहे. तसेच या पुढील काळात अशाच चुका केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

यादीच केली प्रसिद्ध

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ३० सप्टेंबर रोजी यासंदर्भातील यादीच प्रसिद्ध केली आहे. ३७ पानी परिपत्रक काढून परीक्षेच्या कामात चुका केलेल्या संबंधित महाविद्यालये आणि प्राध्यापकांची यादीच त्यात प्रसिद्ध केली आहे. या यादीत निकालात त्रुटी राहिल्या विद्यार्थ्यांची संख्या दिली आहे. विद्यापीठाने केलेल्या या कारवाईचे विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.