बाबरी मशिदीची ती वीट घेऊन राज ठाकरे पुण्यात, त्या विटेचे काय करणार

Raj Thackeray in Pune | अयोध्येतील वादग्रस्त ढाचा असलेली बाबरी मशीद १९९२ मध्ले पाडली गेली. त्यानंतर तिची एक वीट राज ठाकरे घेऊन आज पुण्यात आले. ही वीट त्यांना काही दिवसांपूर्वी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली होती.

बाबरी मशिदीची ती वीट घेऊन राज ठाकरे पुण्यात, त्या विटेचे काय करणार
Follow us
| Updated on: Feb 10, 2024 | 2:25 PM

प्रदीप कापसे, पुणे, दि. 10 फेब्रुवारी 2024 | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात आले. अयोध्येतील वादग्रस्त ढाचा असलेली बाबरी मशीद पाडल्यानंतर तिची वीट राज ठाकरे घेऊन पुण्यात आले. ही वीट काही दिवसांपूर्वी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी त्यांना दिली होती. बाळ नांदगावकर 1992 मध्ये बाबरी मशीद पडली त्यावेळी अयोध्येला गेले होते. कारसेवक म्हणून बाळ नांदगावकर गेले होते. त्यांनी येताना मशिदीची वीट आपल्यासोबत आणली होती. ती वीट त्यांनी राज ठाकरे यांना नुकतीच दिली. राज ठाकरे ही वीट घेऊन पुण्यात आले.

कोणाला दिली वीट

पुण्यातील इतिहास संशोधक मंडळात राज ठाकरे आले. यावेळी त्यांनी शिवकालीन पत्राची पाहणी केली. त्यानंतर इतिहास संशोधक मंडळाला बाबरी मशिदीची ती वीट दिली. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आम्ही आमच्याकडे महापुरुषांना जातीत पाहतो. त्यावरुन राजकारण केले जाते. हजारो वर्षांचा इतिहास खास करुन महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राचा इतिहास नक्की वाचला पाहिजे. हा इतिहास का वाचावा तर वर्तमानात कसं जगावं ? हे शिकायला मिळाला पाहिजे. त्यामुळे तो वाचला पाहिजे. इतिहासावर संशोधन करणारी ही संस्था आहे. या संस्थेसाठी मला काहीतरी कारवासे वाटते. यामुळे आज मी संस्थेला २५ लाख रुपये देत आहे.

हे सुद्धा वाचा

ब्रिटनमध्ये पुतळे का नाही

ब्रिटनमध्ये पुतळे का नाही? उदाहरण सांगतात राज ठाकरे म्हणाले, आमचा इतिहास जाती पतीतून सुरू होतो. आमचे महापुरुष जातीत विभागले गेले आहे. ब्रिटनमध्ये पुतळे का नाही? कारण तिथील लोक म्हणतात, आमच्या रक्तात महापुरुष आहे.

का दिली ती वीट

बाळा नांदगावकर यांनी आणली ही वीट मी पाहिली. बाबरीचा ढाचा पडला तेव्हा ते ही वीट घेवून आले होते. ती वीट पाहा, त्याचे वजन पाहा. एक हातोडा पडला आणि बाबरी पाडली, असे झाले नाही. कारण त्यावेळी स्ट्रक्चर चांगला होते. कारण त्यावेळी टेंडर निघत नव्हती. ती वीट मी माझ्या घरात ठेऊन काय करणार? किंवा बाळ नांदगावकर त्यांच्याकडे ठेऊन काय करणार? आज ती वीट इतिहास संशोधक मंडळाला देण्यासाठी मी आलो आहे. त्या विटेवर संशोधन होणे गरजेचे आहे. ती वीट चांगल्या संस्थेच्या हातात जावी, हा माझा हेतू आहे. त्यासाठी मी आलो आहे.

Non Stop LIVE Update
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात.
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......