AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray in Pune : आज पुण्यात होणार ‘राजगर्जना’ ; वर्धापनदिनासाठी राज्यभरातील कार्यकर्ते शहरात दाखल

आज सायंकाळी 6 वाजता राज ठाकरे मनसैनिकांना संबंधित करणार आहेत . राज ठाकरे काय बोलणार याकडं सर्वांचे लक्ष लागले आहे .मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये स्वतः जातीने लक्ष घातले आहे. यासाठी मागील काही महिन्यांपासून त्यांनी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक येथील महापालिकांच्या निवडणुकीची तयारी सुरु केलीय.

Raj Thackeray in Pune : आज पुण्यात होणार 'राजगर्जना' ; वर्धापनदिनासाठी राज्यभरातील कार्यकर्ते शहरात दाखल
राज ठाकरेImage Credit source: Tv9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 09, 2022 | 10:13 AM
Share

पुणे- पुण्यातील गणेश कला क्रीडा केंद्रात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा  PMC)वर्धापन दिन सोहळा संपन्न होणार आहे . मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) स्वतः येथे उपस्थित राहत राज्यभरातील मनसेच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली असून राज्यभरातील कार्यकर्ते शहरात दाखल झाले आहेत. आगामी महानगरपालिकांच्या (Municipal elections) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा दौर अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे अवघ्या राज्याचे लक्ष या वर्धापन दिनाकडे लागून आहे. आज सायंकाळी 6  वाजता राज ठाकरे मनसैनिकांना संबंधित करणार आहेत . राज ठाकरे काय बोलणार याकडं सर्वांचे लक्ष लागले आहे .मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये स्वतः जातीने लक्ष घातले आहे. यासाठी मागील काही महिन्यांपासून त्यांनी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक येथील महापालिकांच्या निवडणुकीची तयारी सुरु केलीय. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर मनसेचा वर्धापन दिन पुण्यात नाही ना, असे अनेक प्रश्न सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.

काय असणार ‘राजगर्जना’

केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवर काय भाष्य करणार. याबरोबरच मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याबाबत मनसेची भूमिका स्पष्ट करणार आहेत का ? राज्यातील महाविकास आघाडीच्या 2 वर्षाच्या कारभारावर काय बोलणार. ओबीसी आरक्षणासंदर्भात मनसेची पुढील भूमिका स्पष्ट करणार का? मनसे – भाजप युतीसंदर्भात स्पष्टीकरण आज होणार का? या महापालिका निवडणुकीसाठी एकला चलो रे नारा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज ठाकरेंचं लक्ष महापालिका निवडणूक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यापूर्वी नाशिका महापालिकेतील सत्ता मिळाली होती. आता मनसेनं राज्यातील महापालिका निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. मुंबईसह मनसेनं यावेळी ठाणे, नाशिक, पुणे या महापालिकांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केलंय. त्यामुळे पुण्यात होणारा मनसेचा वर्धापन दिन किती प्रभावी ठरणार आहे.

यवतमाळात गॅस सिलेंडरचा स्फोट, मायलेकीचा होरपळून मृत्यू!

PM Kisan Yojna : 25 मार्चला ठरणार’त्या’शेतकऱ्यांच्या योजनेचे भवितव्य, 31 मार्चला चित्र स्पष्ट

Aurangabad | ब्लॅक लीस्टमधल्या ठेकेदाराला वाळूचे कंत्राट, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना खंडपीठाची नोटीस

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.