AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune crime : कामगार झोपले की त्यांचे मोबाइल चोरून विकायचा; रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अल्पवयीन मुलाला घेतलं ताब्यात

शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील हे कामगार रांजणगाव, कारेगाव, ढोकसांगवी याठिकाणी राहतात. त्यांच्या खोल्यांमधले मोबाइल चोरून हा अल्पवयीन मुलगा ते विकत असे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्याचे प्रताप उघड झाले आहेत.

Pune crime : कामगार झोपले की त्यांचे मोबाइल चोरून विकायचा; रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अल्पवयीन मुलाला घेतलं ताब्यात
रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी जप्त केलेले चोरीचे मोबाइलImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jun 15, 2022 | 12:49 PM
Share

शिरूर, पुणे : रांजणगाव एमआयडीसी (Ranjangaon MIDC) पोलीस ठाणे हद्दीत कामगारांचे मोबाइल चोरी करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचे 40 मोबाइल संच जप्त (Mobiles seized) करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांनी दिली. रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत अनेक कामगार वास्तव्यास आहेत. अनेक कामगार हे शिफ्टनुसार काम करीत असतात. कामाच्या वेळा प्रत्येकाच्या वेगळ्या असल्याने कामगार हे खोलीचा दरवाजा उघडा ठेवून बऱ्याचदा झोपतात. हीच संधी साधून काहीजण मोबाइल चोरीचा प्रयत्न करतात. गेल्या काही दिवसांपासून अशा चोऱ्यांचे प्रमाण एमआयडीसी परिसरात वाढत असल्याने चोरीचा छडा लावणे गरजेचे होते. कामगारांनीही तशी मागणी केली होती. त्यानुसार रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला (Minor boy) अटक केली आहे.

सीसीटीव्ही तपासले

शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील हे कामगार रांजणगाव, कारेगाव, ढोकसांगवी याठिकाणी राहतात. त्यांच्या खोल्यांमधले मोबाइल चोरून हा अल्पवयीन मुलगा ते विकत असे. साधारणपणे आठ तास काम करून हे कामगार घरी परतत असतात. उन्हाळ्याचे दिवस असल्याने दरवाजे, खिडक्या उघडे ठेवले जातात. याचाच गैरफायदा या चोरांकडून घेतला जातो. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता या चोरीचा प्रताप उघड झाला आहे. रांजणगाव MIDC पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्याच्याकडून 4 लाख 50 हजार किंमतीचे जवळपास 40 महागडे मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. स्थानिक पोलीस स्टेशनच्या हद्दीत सहा मोबाइल चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत. आता या मोबाइल मालकांचा शोध घेऊन त्यांना ते दिले जाणार आहेत.

‘दरवाजे आतून व्यवस्थित लावावे;

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने केली. दरम्यान, कामगारांनी रात्रीच्या वेळी खोलीचे दरवाजे आणि खिडक्या व्यवस्थित लावल्याची दक्षता घ्यावी, जेणेकरून मोबाइल चोरीचे प्रकार घडणार नाहीत, असे आवाहन रांजणगाव पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...