शहरातील 50 टक्के बेड राखीव ठेवा, खासगी रुग्णालयांना पुणे महापालिकेचे आदेश

गेल्या काही दिवसांत पुण्यात कोरोना रुग्णांमध्ये (Pune Corona Update) सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील 50 टक्के बेड राखीव ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत.

शहरातील 50 टक्के बेड राखीव ठेवा, खासगी रुग्णालयांना पुणे महापालिकेचे आदेश
पुणे महानगरपालिका आणि कोरोना विषाणू
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 8:26 AM

पुणे : गेली वर्षभर कोरोनाने सगळ्या जगाला हैरान केलं. कित्येक महिने तर कोरोनाच्या धास्तीने लॉकडाऊन केलं गेलं. काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात येतोय, अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र आता नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलेलं आहे. गेल्या काही दिवसांत पुण्यात कोरोना रुग्णांमध्ये (Pune Coorna Update) सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील 50 टक्के बेड राखीव ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Pune Municipal Commissiner Vikram Kumar) यांनी दिले आहेत. (Reserve 50 percent beds in the city, orders of Pune Municipal Corporation to private hospitals)

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता ऐनवेळी रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे पालिका प्रशासन सावधरित्या पावले टाकत आहे. कोरोनाच्या पीक पिरियडमध्ये कोरोनाग्रस्तांना बेड मिळत नसल्याच्या अनेक तक्ररी ऐकायला मिळाल्या. याचीच पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये म्हणून पालिका प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आहे.

पुणे महापालिकेनं खाजगी रुग्णालयांना बेडसंदर्भात सूचना देताना शहरातील 50 टक्के बेड राखीव ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत. खाजगी रुग्णालय प्रमुखांशी झालेल्या बैठकीत पालिकानआयुक्तांनी शहारातील रुग्णालयांना अश्या प्रकारच्या सूचना दिल्या आहेत.

खासगी रुग्णालयातील बेडची माहिती डँशबोर्डवर अपडेट करणं बंधनकारक करण्यात आली आहे. तसंच कोरोना रुग्णाला खाजगी रूग्णालयानं प्रवेश नाकारल्यास महापालिका करणार कारवाई आहे. त्यामुळे कोणत्याही कोरोना रुग्णाला नाकारण्याचं धाडस खासगी रुग्णालयांनी करु नये, अशी तंबीच पालिका आयुक्तांनी दिली आहे.

दुसरीकडे खाजगी रुग्णालयातील बेड ताब्यात घ्यायला महापालिकेने सुरुवात केली आहे. वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे पुणे महापालिकेने अलर्ट होत एक पाऊल पुढे टाकलं आहे.

पुण्यात कोरोनाचा पुन्हा ब्लास्ट

पुणे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा धोका वाढतोय. शहरात सुमारे महिनाभराच्या खंडानंतर पुन्हा एकदा अधिकाधिक संख्येने नवे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. शिवाय मागील दहा दिवसांपासून दररोज सातत्याने नव्या रुग्णांत वाढ होतेय. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून दररोज प्रसिद्ध होणाऱ्या अहवालातून स्पष्ट होतंय.

हॉटेल आणि रेस्टॉरंटचा कारवाईचा बगडा सुरु

कोरोनाच्या वाढच्या संसर्गाला नियंत्रित आणण्यासाठी महापालिका आणि पोलिसांनी नियमांचा भंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. विना सोशल डिस्टन्सिंग आणि 50 टक्के ग्राहकांना प्रवेश देण्याच्या अटीचे उल्लंघन करणाऱ्या रेस्टॉरंटवर गेल्या काही दिवसांत कारवाई केली जात आहे. तसंच विना मास्क फिरणाऱ्या फिरस्तींवरही महापालिकेने आर्थिक दंडाची कारवाई केली आहे.

(Reserve 50 percent beds in the city, orders of Pune Municipal Corporation to private hospitals)

हे ही वाचा :

बुलडाण्यात एकाच गावातील 155 जणांना कोरोनाची लागण; धार्मिक कार्यक्रमातून संसर्ग?

गजा मारणेच्या ताफ्यातील 300 गाड्यांनी टोल बुडवला; खंडणीचा गुन्हा दाखल होणार

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.