AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘काही करा, पण जमीन विकू नका’, शरद पवार यांची शेतकऱ्यांना कळकळीची विनंती

शरद पवार सध्या बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी एका गावात शेतकऱ्यांना जमीन न विकण्याचा सल्ला दिला. शरद पवारांनी जमीन घेणाऱ्या एजंट लोकांना गावात फिरू न देण्याचादेखील सल्ला गावकऱ्यांना दिला.

'काही करा, पण जमीन विकू नका', शरद पवार यांची शेतकऱ्यांना कळकळीची विनंती
शरद पवार
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jun 20, 2024 | 6:55 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना जमीन न विकण्याची कळकळीची विनंती केली. शरद पवार हे सध्या बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. बारामतीमधील विविध गावांना ते भेटी देत आहेत. या दरम्यान लोणी भापकर या गावी आले असता शरद पवार यांनी शेतकऱ्यांना जमीन न विकण्याचा सल्ला दिला आहे. शरद पवारांनी जमीन घेणाऱ्या एजंट लोकांना गावात फिरू न देण्याचादेखील सल्ला गावकऱ्यांना दिला. “काही करा. पण जमीन विकू नका. पुणेकर, मुंबईकर येतील. पण जमीन तर आपली आहे. काही ना काही मार्ग निघतो. तुम्ही काही काळजी करू नका. कोणी एजंट गावात येत असेल तर त्याला गावात येऊ देऊ नका”, असं आवाहन शरद पवारांनी गावकऱ्यांना केलं.

“पिकविणाऱ्याने पिकवले नाही तर खाणारा काय खाईल? पिकविणारा उद्ध्वस्त झाला तर खाणारा पण उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. पंतप्रधान राज्यात येतात आणि एकाच व्यक्तीला लक्षात ठेवतात. यातून सुटका करायची असेल तर त्यांच्या हातून सत्ता काढून घ्यावी लागेल. मी ठरवलं आहे की, राज्यात बदल करायचा. महाराष्ट्राचे राज्य हातात घ्यायचंय”, असा निर्धार शरद पवार यांनी व्यक्त केला.

‘मोदींना माहिती नाही, बारामतीची गॅरंटी काय असते’

“सगळीकडे चर्चा होती, बारामतीमध्ये काय होणार? पण मला विश्वास होता. या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांना बारामतीकर मोठं मतदान करतील ही खात्री होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी १.५० लाख मतांनी निवडून आले आणि तुमच्या उमेदवार १.८० लाख मतांनी निवडून आल्या. मोदींना माहिती नाही, बारामतीची गॅरंटी काय असते. मोदी आणि माझं काही वाकडं नाही, त्यांचं धोरण चुकीचं आहे. त्यांचं धोरण आपल्या हिताचं नाही. त्यांचं धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे नाही”, अशी टीका शरद पवारांनी केली.

मोरगाव येथील भाषणातही पवारांची मोदींवर टीका

दरम्यान, बारामतीच्या मोरगाव येथे देखील शरद पवार यांच्या जनसंवाद सभेचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली. “बारामती लोकसभा निवडणुकीची संपूर्ण देशात चर्चा झाली. या निवडणुकीचे वैशिष्ट्य असे की, काही लोकांनी दमदाटी केली. नवीन लोकांना आवर घालण्याचे काम काही लोकांनी केलं. पण या वेळेस निवडणूक सामान्य आणि कष्टकरी लोकांनी हातात घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यात 18 ठिकाणी प्रचार केला. त्या 10 ठिकाणी उमेदवार पडला. मोदींनी उद्याच्या विधानसभा निवडणुकीत जास्त ठिकाणी प्रचारासाठी यावं. मोदी महाराष्ट्र राज्यात येऊन त्यांनी मोदी गॅरंटी सांगितली पण त्यांची गॅरंटी कामाला आली नाही. राष्ट्रवादी पक्षाच्या 10 पैकी 8 जागा निवडून आल्या”, असं शरद पवार म्हणाले.

Follow Us
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र