AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सडका हिंदू समाज, द्वेष, काँग्रेसची बेईमानी ते उलटून मारणार, शरजील उस्मानीचं वादग्रस्त संपूर्ण भाषण इथं एका क्लिक करा

हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हा नारा देणारे बेईमान लोक आहेत.यांच्याव्यतिरिक्त अनेक लोक इथं राहतात ज्यांचा समावेश या नाऱ्यामध्ये नाही.

सडका हिंदू समाज, द्वेष, काँग्रेसची बेईमानी ते उलटून मारणार, शरजील उस्मानीचं वादग्रस्त संपूर्ण भाषण इथं एका क्लिक करा
| Updated on: Feb 03, 2021 | 7:33 AM
Share

पुणे : माझं नाव, माझा हुद्दा या पलीकडं मला एक मुस्लिम तरुण  म्हणून ऐका (Sharjeel Usmani Full Speech). जो आपलं दुःख, आपला राग आणि युद्धाची घोषणा करायला इथं आलाय. मी पहिल्यांदाच मुस्लिमेत्तर समाजासमोर बोलतोय. जेव्हा आपण सगळे धर्म एकत्र यावेत आणि अन्याया विरुद्ध एकत्र उभं राहावं. पण चिंता याची वाटते की दलित समाजाचा नेते स्टेजवरुन म्हणतात आम्ही मुस्लिमांसोबत आहोत, मुस्लिम समाजाचे नेते म्हणतात आम्ही दलितांसोबत आहोत पण प्रत्यक्षात समाजात या दोन्ही समाजात मैत्री नाहीये, दुश्मनी आहे (Sharjeel Usmani Full Speech).

जेव्हा कार्यक्रमात एकत्र येतो तेव्हा मैत्री, एकमेकांची दुःख दिसतात. आपल्या घरापर्यंत आपण सगळे एकत्र आहोत हा संदेश पोहोचवला पाहिजे. कोरेगाव भीमाच्या लढ्यात जर सगळे सोबत होते, तर आज का सगळे एकत्र येऊ शकत नाहीत.

या देशात राहणारे सगळे जण एक आहेत, हे खोटं बोललं गेलं.1930 ला काँग्रेसने हे खोटं सांगितलं, की या इथं राहणारे सगळे एक राष्ट्र आहेत. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हा नारा देणारे बेईमान लोक आहेत.यांच्याव्यतिरिक्त अनेक लोक इथं राहतात ज्यांचा समावेश या नाऱ्यामध्ये नाही.

आणि जर हिंदू, मुस्लीम, शीख, ईसाई हे चारही भाऊ आहेत, तर प्रत्येक वेळी फक्त मुस्लिम भावावर अन्याय का होतो? जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही, तोपर्यंत लढाई पुढे नेता येणार नाही.

माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात, मी एन्काऊंटर करणार. आणि सत्तेत आल्यावर त्यांनी वर्षभरात 19 जणांना मारलं, अन हे सगळे दलित, मुस्लिम होते. माझा भारतीय पोलिसांवर, राज्यावर सुद्धा विश्वास नाहीये.

भारतात आपल्याला नॅशनलिस्ट व्हायचं असेल तर दोन गोष्टी कराव्या लागतात. एक काश्मीर हा भारताचा भाग आहे म्हणायचं, अन दुसरं पाकिस्तान मुर्दाबाद म्हणायचं. या दोन गोष्टी बोलल्यावर इथं तुम्ही नॅशनलिस्ट ठरता.

आजचा हिंदू समाज हा वाईट पध्दतीने सडलेला आहे. सर्वांच्या डोळ्यासमोर लिचिंगच्या घटना घडत असताना कोणी त्या थांबवायला पुढे येत नाही. लिंचिग करणारे लोक असं काय करतात की ते सहज पुन्हा सर्वांमध्ये मिसळून जातात. लिंचिंगच्या घटना ह्या सामान्य करून टाकल्यात, लिंचिंग होतय काही हरकत नाही.

या आधी भारतात मुसलमानांना मारण्यासाठी कारण लागायचं. हा मुसलमान सिमीचा आहे, हा आतंकवादी आहे, इंडियन मुजाहिद्दीनचा आहे, अन मग त्याला मारलं जायचं. आता मात्र कोणतेही कारण लागत नाही, मुसलमान आहे मारुन टाका एवढं पुरेसं आहे.

मुसलमानांना मारुन टाकणं ही एक सामान्य गोष्ट करुन टाकली आहे. भारतात आमची लढाई ही द्वेषाच्या विरुद्ध आहे, कोणी नेता, कोणती पार्टी याच्या विरुद्ध नाही. जो द्वेष मुसलमानांना मारायला लावतो. जो द्वेष मुसलमानांना आपलं घराजवळ भाड्याने घर देऊ नका सांगतो. हा तोच द्वेष आहे ज्याला जिथं संधी मिळेल तिथे तो त्याला हवं तसं करतो.

याच द्वेषामुळे सरकार ताकतवर होतं. हा द्वेष संपवला पाहिजे, हा द्वेष संपवण हे मुसलमानांच काम नाही. हा द्वेष संपवण हे त्यांचं काम आहे जे हा द्वेष पसरवत आहेत. जे हा द्वेष पसरवत आहेत, त्यांनी स्वतःला या द्वेषापासून स्वतंत्र करायला हवं. आम्ही फक्त सांगू शकतो की तुम्ही द्वेष करत आहात अन हे चुकीच आहे. अन आम्ही हे सांगत राहणार. दोन पध्दतीने मुसलमान समाजाकड पाहिलं जात. एक मुसलमान आहे तर मारुन टाका, अन दुसरा जो चांगला हिंदु समाज जो म्हणतो आम्ही मुसलमान समाजासोबत आहोत. हा चांगला हिंदू समाज म्हणतो मुसलमान बिचारा आहे, व्हिक्टीम आहे ही जी प्रतिमा तयार केलीये ती चुकीची आहे.

मुसलमान हा बिचारा आहे किंवा, व्हिक्टिम आहे. आम्हाला यासगळ्यात अडकवलं जातं, कारण आम्ही प्रश्न विचारू नये. पण आता असं होणार नाही, माझ्यावतीनं धमकी आहे हिंदू समाजातील लोकांना. की तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या, माणूस कितीही कमजोर असू द्या. जर तुम्ही त्याच्या जीवनाशी खेळाल तर तो एकदा उलटून त्याचं उत्तर देणार. एवढं पण करु नका की उलटून उत्तर द्याव लागेल.

आज भीमा कोरेगावच्या स्मृती जागवत एल्गार पुकारलाय. एल्गारचा अर्थ होतो युद्धाचं आव्हान. अन युद्धाच आव्हान तेव्हाच करता येईल जेव्हा आपल्यात लोक शहीद व्हायला, त्याग करायला तयार असतील. आज एल्गार पुकारताना आपल्याला पण शहीद व्हावं लागेल, त्याग करावा लागेल (Sharjeel Usmani Full Speech).

छोट्या छोट्या गोष्टींचा त्याग  कराव्या लागतील. माझा मुलगा द्वेष पसरवतोय, स्वत:ला दुसऱ्यांपेक्षा वरचढ समजतोय. त्याला आपल्याला समजवावे लागेल, तो तुझ्या बरोबरचा आहे, त्याच्यावर प्रेम करायला शिक.

कोठेही द्वेष करायला शिकवत असतील, तर घरात येऊन सांग. शिक्षक जर वर्गात तुम्हाला सतत जाणीव करून देत असतील तुम्ही मुसलमान आहात, दलित आहात. तर त्यांना तिथचं समजावून सांगा. यानंतर सुद्धा युद्धाची भाषा केली जाईल, तेव्हा प्रश्न विचारा का लढायचं.

मागच्या काळात जसे मुसलमानांवर हल्ले झाले तसेच इस्लाम धर्मावरही झाले. खुलेआम इस्लाम धर्मावर हल्ला होतोय. कोणीही येऊन काहीही बोलतय. चौधरी चरणसिंग म्हणाले, कुराण वाचणारा माणूस हैवान होईल. हिंदू राष्ट्र चार वर्षात होईल, तेव्हा यांच्या मुली तुमच्याकडे असतील. असे लोक तुमचा समाज सडवत आहेत.

तुमची मुलं अश्या कार्यक्रमांना जात आहेत. मी दोन्हीकडे बोटं दाखवेल. तुम्ही तुमच्या लोकांना द्वेष पसरवणाऱ्या ठिकाणापासून खेचून परत आणा, आम्ही आमच्या लोकांना परत आणू. तेव्हा आपण एकतेचा गोष्टी करु शकतो. शपथा घेणं, नारे देणं आपलं काम नाही.

ते नेत्यांचं काम आहे, आझादीचे नारे दिले, निघून गेले, त्यातून काही काम होत नाही. समाजात एकमेकांशी बोलून काम होतं. ज्यांना आपलं म्हणणं पटत नाही, अश्यांशी बोलून काम होतं.

तुमचं मला अन माझं तुम्हाला पटत आपण टाळ्या वाजवतो अन निघून जातो. असं करुन आझादी येत नाही, लोकांना एकत्र करावे लागेल. आपल्याला जुलमांच्या विरोधात अमन हवाय.

Sharjeel Usmani Full Speech

संबंधित बातम्या :

शरजीलला आमच्याकडे सोपवा, परत कधी हिंदूना सडका म्हणणार नाही : नितेश राणे

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.