मूळचा माढ्याचा, पाकिस्तानमध्ये कसा पोहोचला?, 7 वर्षानंतर परतला; पण या काळात काय काय घडलं?

मूळचा माढ्याचा असलेले सत्यावान भोंग तब्बल सात वर्षानंतर घरी परतले आहेत. मनोरुग्ण असलेले सत्यवान थेट पाकिस्तानमध्ये पोहोचले होते. पण नियतीने त्यांना पुन्हा आई-वडिलांकडे पाठवलं. (Solapur : Satyavan found in Pakistan return home after seven years)

मूळचा माढ्याचा, पाकिस्तानमध्ये कसा पोहोचला?, 7 वर्षानंतर परतला; पण या काळात काय काय घडलं?

सोलापूर: मूळचा माढ्याचा असलेले सत्यावान भोंग तब्बल सात वर्षानंतर घरी परतले आहेत. मनोरुग्ण असलेले सत्यवान थेट पाकिस्तानमध्ये पोहोचले होते. पण नियतीने त्यांना पुन्हा आई-वडिलांकडे पाठवलं. त्यांचा हा प्रवास थक्क करणारा तसाच रोमांचक आहे. त्याबाबतचा घेतलेला हा आढावा…. (Solapur : Satyavan found in Pakistan return home after seven years)

सत्यावान भोंग हे मूळचे सातारा जिल्ह्यातील लऊळ गावचे आहेत. पुण्यातून ते हरवला होते. ते मनोरुग्ण आहेत. त्यामुळे त्याला 2013 मध्ये पुण्यातील एका रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र सत्यवान तिथून हरवले. यानंतर सत्यवान यांना शोधण्याचा भरपूर प्रयत्न भोंग कुटुंबाने केला. पण त्यांच्या पदरी निराशाच पडली. तब्बल सात वर्षांनी सत्यवान यांचा शोध भोंग कुटुंबाला लागला. गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात पोलीसांनी सत्यवान यांचे भाऊ दिगंबर यांना संपर्क साधला. सत्यावान यांच्याबद्दल माहिती विचारली. त्यांचे ओळखपत्रे तसेच इतर कागदपत्रे मागितली. कारण सात वर्षापासून पाकिस्तानात असलेल्या सत्यवानचा शोध लागला होता. याचा आनंद सत्यवान यांची ९० वर्षाची आई केशरबाई आणि भावांना झाला होता.

भारतात येऊनही ताबा नाही

आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर सत्यवान यांना भारताच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, तीन महिने अमृतसरमध्येच त्यांना थांबावे लागले होते. तीन महिन्यानंतर ते सोलापूरला स्वगृही परतले. सत्यवान मायदेशी यावेत म्हणून पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे, माजी उपसभापती प्रताप नलावडे, सदस्य पवन भोंग यांनी प्रयत्न केले. माढा वेल्फेअर फाऊंडेशनच्या वतीने सत्यवान यांचा कुर्डुवाडी ते अमृतसर हा प्रवासाचा खर्च उचलण्यात आला. या फाऊंडेशनने 20 हजार रुपयांची मदत केली.

अमृतसरमधून ताब्यात घेतलं

गुरुवारी अमृतसर येथील कॅम्पमधून सत्यावान यांचे पुतणे गणेश भोंग यांनी कुर्डुवाडी मधील पोलीस अधिकऱ्यासोबत जाऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून सत्यवान यांना नातेवाईकांच्या ताब्यात दिले. आता सत्यवान लऊळ मधील आपल्या घरी आले आहेत. सात वर्षापासून हरवलेला आपला मुलगा घरी आल्यानंतर आई केशरबाई यांना आकाश ठेंगणे झाले आहे. दिसत नसले तरी मुलाच्या चेहऱ्यावरून अंगावरून मायेने हात फिरवत आहेत. घरी आलेला सत्यवान आता घरच्या कामात मदत करत आहेत. भावाच्या मदतीने शेतात काम करत आहेत. पण सात वर्षात सत्यवान नक्की पाकिस्तानात कुठे होता? कसा राहिला? काय काम केले? घरच्यापर्यंत कसा पोहचला? याची उत्तरे फक्त सत्यवान यांनाच माहिती आहे. पण सध्या ते फक्त शांत आहेत. (Solapur : Satyavan found in Pakistan return home after seven years)

संबंधित बातम्या:

भाई जगतापांच्या नेतृत्वात मुंबईत कात टाकतेय काँग्रेस? पाहा आजच्या मोर्चाची गर्दी!

आज अमित शाह कोकणात, आघाडीत ‘ऑपरेशन लोटस’ची भीती? काँग्रेसनं संधी दिली?

LIVE : मुंबईत काँग्रेस विरूद्ध भाजप आमने-सामने, काँग्रेसचं आंदोलन तर भाजपची स्वागतासाठी रॅली

Published On - 11:36 am, Sun, 7 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI