AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यंदाचा संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर पालखी प्रस्थान सोहळा कसा असेल?

सर्व वारकऱ्यांना पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागलीय. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना वारीत प्रत्यक्ष हजर राहून दर्शन करता येणार नाहीये.

यंदाचा संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर पालखी प्रस्थान सोहळा कसा असेल?
आषाढी वारी, फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Jun 30, 2021 | 5:45 PM
Share

पुणे : सर्व वारकऱ्यांना पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागलीय. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना वारीत प्रत्यक्ष हजर राहून दर्शन करता येणार नाहीये. प्रातिनिधिक स्वरुपात मोजक्या वारकऱ्यांना वारीला परवानगी देण्यात आलीय. त्यामुळे या वारकऱ्यांसह गुरुवारी (1 जुलै) देहूतून तुकाराम महाराज आणि आळंदीतून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होतंय. यंदाचा वारी सोहळा कसा असणार याविषयी अनेक भाविकांना उत्सुकता आहे. म्हणून त्यांच्यासाठी हा खास रिपोर्ट (Special report on Sant Dnyaneshwar and Tukaram Palakhi Sohala of Dehu Alandi wari).

पंढरपूरच्या आषाढी वारीला जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यापासून सुरुवात होते. प्रस्थान सोहळ्याच्या 3 दिवस आधीचं देहूनगरीत आणि आळंदीत लाखो वारकरी जमायला सुरुवात होते. जगद्गुरू तुकाराम महाराजांचा यंदाचा 336 वा पालखी प्रस्थान सोहळा उद्या (1 जुलै) पार पडतोय, तर 2 जूलैला आळंदीतून ज्ञानेश्वरांच्या पालखीचं प्रस्थान होतंय, मात्र यंदा कोरोनामुळं राज्य सरकारने पायी वारीला परवानगी नाकारली आणि बसनंच पालखी पंढरपूरला नेण्याचा निर्णय घेतला.

एसटी महामंडळाच्या 8 शिवशाही बसेसमधून वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करणार

यानुसार एसटी महामंडळानं 8 शिवशाही बसेसंही उपलब्ध केल्यात. मात्र यंदा देहूतलं आणि आळंदीतलं चैतन्य मात्र हरवलंय. जिथं वारकरी श्नद्धेनं आपलं डोकं टेकवतो अशा मंदिरात आज फक्त शांतता पाहायला मिळतीये. प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदीतील मंदिराला 5 हजार किलोची सजावट केली जाणार आहे. देहूतील मंदिरही आकर्षक अशा फुलांनी सजवलं जाईल. प्रस्थान सोहळ्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती, देहू संस्थानचे पालखी प्रमुख संजय मोरे यांनी दिलीय.

मानाचे 100 वारकरी मंदिरात सोडणार

संत तुकाराम महाराजांच्या देहूतील पालखीचं प्रस्थान उद्या दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. दुपारी 2 वाजता मानाचे 100 वारकरी मंदिरात सोडले जातील. पूजा होऊन पादूकांना नगर प्रदक्षिणा घातली जाईल आणि पालखी मंदिरातचं विसावेल. 2 जूलैला माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होईल आणि माऊलींची पालखी परंपरेप्रमाणे आजोळघरी मुक्कामी विसावेल. 19 जूलैला माऊली आणि तुकाराम शिवशाही बसनं पंढरपूराकडे मार्गस्थ होतील. असा माऊली आणि तुकारामांचा पालखी सोहळा संपन्न होईल.

शासनाच्या निर्णयाचं पालन करणार, वारकऱ्यांकडून आश्वासन

यंदा वारीवरून राज्य सरकारवर बरीच टिका झाली. कारण वारकऱ्यांनी देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर पायी जाण्याची परवानगी मागितली मात्र ती नाकारण्यात आली. कारण वारकरी हा पालखी निघाली की ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता पंढरीजवळ करतो. त्याला आस लागलेली ती विठूरायाच्या भेटीची. मात्र यंदा तसा सोहळा हा महाराष्ट्राला अनुभवता येणार नाहीये, मनात जरी पायी वारी करता येणार नाही ही खंत असली तरी शासनाच्या निर्णयाचं पालन करणार असल्याचं वारकरी सांगतायेत.

समाजावरती संकट आल्यावर वारकरी सांप्रदायानं दिशा दाखवली

शांतता पाहायला मिळत असली, तरी ती इंद्रायणी अजूनही वारकऱ्यांची वाट पाहतीये. इंद्रायणीचा काठ ओस पडला. गेल्या वर्षीची खंत यंदा भरून निघेल. देहू आणि आळंदी वारकऱ्यांनी फुलून जाईल असं वाटलं. मात्र पदरी निराशा पडली. असं जरी असलं, तरी ज्या ज्या वेळी समाजावरती संकट ओढावलं त्या त्या वेळी वारकरी सांप्रदायानं दिशा दाखवली आणि सहिष्णू म्हणजेच संयमाचा मार्ग पत्करला. त्या प्रमाणेच यंदाही वारकऱ्यांची भागवत धर्माची पताका खांद्यावर घेण्याबरोबरचं आरोग्याची पताकाही खांद्यावर घेतली आणि एसटीतूनचं वारी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वारकऱ्यांनी वारकरी धर्माची परंपरा खंडीत न होऊ देता मोठ्या मनाने यंदाचा सोहळा करण्याचं ठरवलंय. त्यामुळे जरी मनात खंत असली तरी मानाचे वारकरी मात्र उत्साहात प्रस्थान सोहळा पार पाडतील.

हेही वाचा :

संत तुकाराम महाराज पालखी 1 जुलैला देहूवरुन पंढरपूरकडे निघणार, वाचा 1 ते 19 जुलैचा प्रस्थान कार्यक्रम

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी 2 जुलैला आळंदीतून पंढरपूरकडे निघणार, वाचा 2 ते 24 जुलैचा प्रस्थान कार्यक्रम

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहूगाव व आळंदीत 7 दिवस संचारबंदी, सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार

व्हिडीओ पाहा :

Special report on Sant Dnyaneshwar and Tukaram Palakhi Sohala of Dehu Alandi wari

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.