सभापतीपदावरील व्यक्ती शिवाजी महाराज, महात्मा फुलेंपेक्षा परमादरणीय आहेत काय?; सुषमा अंधारे यांचा माफी मागण्यास नकार

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विधान परिषदेच्या सभापतींनी पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी माफी मागण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. जे लोक महापुरुषांच्या अपमानावर चकार शब्द काढत नाहीत परंतु निव्वळ विरोधी पक्षाची व्यक्ती आहे म्हणून राजकीय कुरघोडी करण्यासाठी मला झुकवण्याचा प्रयत्न करत असतील तर मात्र मी माफी अजिबात मागणार नाही, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

सभापतीपदावरील व्यक्ती शिवाजी महाराज, महात्मा फुलेंपेक्षा परमादरणीय आहेत काय?; सुषमा अंधारे यांचा माफी मागण्यास नकार
sushma andhareImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 23, 2023 | 10:26 AM

अभिजीत पोते, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 23 डिसेंबर 2023 : सभापतीपदाच्या खुर्चीवरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. भाजप नेत्या देवयांनी फरांदे यांनी अंधारे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे सुषमा अंधारे यांची प्रचंड अडचण झाली आहे. अंधारे यांनी या प्रकरणी विधान परिषदेच्या सभापतींनी पत्र लिहिलं आहे. अंधारे यांनी संस्कृत भाषेत लिहिलेल्या या पत्रातून चूक मान्य केली आहे. पण चूक अनावधानाने झाल्याचं म्हटलं आहे. तुरुंगात जावं लागलं तरी चालेल, पण माफी मागणार नाही, असं अंधारे यांनी म्हटलं आहे. तसेच, सभापतीपदावरील व्यक्ती शिवाजी महाराज आणि महात्मा फुलेंपेक्षा परमादरणीय आहेत काय?, असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.

अंधारे यांचं पत्र जसंच्या तसं

प्रति सभापती, विधान परिषद महाराष्ट्र राज्य

संदर्भ: दिनांक 20 12 2023 रोजी माझ्या संदर्भात सभापती पदाच्या खुर्चीवरून हक्क भंग कारवाईच्या संदर्भात दिलेल्या निर्देशाबाबत..

प्रिय लोकशाही,

तुझ्याबद्दल कायमच मनात आदर आहे आणि तुझं अस्तित्व टिकावं म्हणूनच ही अविरत लढाई आहे. स्वातंत्र्यासाठी ज्या अगणित स्वातंत्र्यवीर आणि वीरांगणांनी प्राणांची आहुती दिली तितकीच कटीबद्धता स्वातंत्र्योत्तर काळात ही संविधानिक लोकशाहीची व्यवस्था टिकवण्यासाठीची आता आमची आहे याचे मला भान आहे.

व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता टिकून ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संवैधानिक मूल्यांचा मी कायमच आदर करत आहे आणि इथून पुढेही तो केला जाईल. त्याचाच भाग म्हणून संविधानाने निर्माण केलेल्या कुठल्याही घटनात्मक पदाबद्दल कमालीचा आदर बाळगणे ही माझी कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून पहिली जबाबदारी आहे असे मी मानते. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे सभापती पद घटनात्मक असल्याने या पदाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे.

पण आज विधिमंडळाच्या सभापती पदावरील ‘व्यक्तीने’ माझ्यावर घटनात्मक पदाचा अवमान केल्याचा ठपका ठेवला आहे. माझ्या ज्या कृतीला ते अपराध या व्याख्येत बसवू इच्छितात. मुळात ती अत्यंत नकळतपणे अनाहूत झालेली चूक आहे. ज्या अनाहूतपणे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेबांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा विषय लोकसेवा आयोग ऐवजी निवडणूक आयोगाकडे विचारणा करू म्हणाले, किंवा देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जी यांचा उल्लेख अनाहूतपणे त्यांनी पंतप्रधान असा केला. अगदी तितक्याच अनाहुत, नकळतपणे माझ्याकडून गोऱ्हे यांचे नाव आले. ही चूक नक्कीच आहे. पण हा दंडनीय अपराध नव्हे. पण तरीही माझ्या कृतीला अपराध ठरवण्याची अहममिका सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांकडून सुरू आहे.

सभागृहाची सभापती पदाची गौरव गरिमा वगैरे शब्द उच्चारले जात आहेत. पण जर खरेच अशी गरिमा सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांना किंवा सभापती पदावरील व्यक्तीला कळत असेल तर मग या सभापती पदाचे किंवा या सभागृहाचे अस्तित्व ज्या संविधानामुळे आहे. त्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा या राज्याची राष्ट्राची आधारशीला ठेवणारे छ. शिवाजी महाराज, म. गांधी , महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज या महापुरुषांचा अपमान जेव्हा मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे किंवा सरकार दरबारमध्ये मंत्री असणारे चंद्रकांत जी पाटील करत होते तेव्हा याच सभागृहाच्या सभापती पदावरील जबाबदार व्यक्तींनी त्यांच्यावर हक्कभंग का आणला नाही. किंवा महापुरुषांचा अपमान होतोय म्हणून आ .प्रवीण दरेकर किंवा सुधीर मुनगुंटीवार यांनी ठामपणे तात्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या संदर्भाने निंदाव्यंजक ठराव सभागृहात का मांडला नाही?

सभापती पदावरील व्यक्तीने आठ दिवसाच्या आत ताबडतोब माफी मागा अशी भूमिका चंद्रकांत पाटील किंवा मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे यांच्याबाबत का घेतली नाही? किंवा महापुरुषांचा अपमान आम्ही अजिबात सहन करून घेणार नाही असे दरेकर किंवा मुनगंटीवार किंवा त्यांच्या सुरात सूर मिसळून सभागृहामध्ये गोंगाट करणारा प्रत्येक सदस्य त्यांनी ही भूमिका का घेतली नाही? की मग सभापती पदावरील व्यक्ती गोऱ्हे या छ. शिवाजी महाराज, म. फुले, राजर्षी शाहू महाराज या सगळ्या महापुरुषांच्या पेक्षाही वरच्या स्तरावर आणि परमादरणीय आहेत का? की जेणेकरून त्यांच्या संबंधाने नकळत निघालेला शब्द सुद्धा अपमान म्हणून गृहीत धरला जातो मात्र राष्ट्रपुरुषांचा जाणीवपूर्वक केलेला अपमान सगळे भाजपचे आमदार आणि स्वतः सभापती पदावरील व्यक्ती मूग गिळून सहन करतात.

प्रिय लोकशाही, माझ्याकडून काही गुन्हा घडला असेल तर निश्चितपणे मी बिनशर्त माफी मागायला हवी. पण पक्षीय राजकारण म्हणून जे लोक महापुरुषांच्या अपमानावर चकार शब्द काढत नाहीत परंतु निव्वळ विरोधी पक्षाची व्यक्ती आहे म्हणून राजकीय कुरघोडी करण्यासाठी मला झुकवण्याचा प्रयत्न करत असतील तर मात्र मी माफी अजिबात मागणार नाही..!!! भलेही यासाठी कारवाईचा भाग म्हणून मला तुरुंगवास पत्करावा लागला तरीही माझी तयारी आहे.

सुषमा अंधारे

Non Stop LIVE Update
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय
माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला तसा भाजप...,रवींद्र धंगेकरांची मागणी काय.