पुणे गारठले; शहराच्या विविध भागात कडाक्याच्या थंडीसह धुक्याचे प्रमाण वाढले

पुणे गारठले;  शहराच्या विविध भागात कडाक्याच्या थंडीसह धुक्याचे प्रमाण वाढले
प्रातिनिधीक फोटो (PTI25-11-2020_000018B)

 पुणे- शहर व उपनगरीय परिसरात थंडीचा (cold) कडाका चांगलाच वाढला आहे. आज शहरातील पाषाण येथे 10.2 तर शिवाजीनगर येथे10.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. बुधवारी शहरात 11.8 व मंगळवारी 12.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. शहरातील शिवाजीनगर, पाषाण, लोहगाव या भागांमध्ये थंडीबरोबरच धुक्याचे प्रमाणही वाढले आहे. बुधवारी शहरातील शिवजीनगर परिसरात सर्वात कमी 11.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मंगळवार तुलनेत बुधवारी सरासरी एक- दोन अंश सेल्सिअसनं तापमानात घटले आहे.

उत्तर-पूर्वेकडील वाऱ्याचा दाब वाढल्याने राज्यातील किमान तापमानात घट जाणवत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत ते भारतीय किनारपट्टीपासून दूर गेले आहे. त्यामुळे हवेतील आद्रर्ता कमी झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. येत्या काही दिवसात शहरात निरभ्र आकाश व कोरडे हवामन राहिल्यानं तापमानामध्ये घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दुसरीकडं पिंपरी चिंचवड परिसरात 17.6  अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, शहरातील धुक्याचं प्रमाणही वाढले आहे.

शहर व उपनगरातील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये बुधवार रात्रीपर्यंतचे)

  • शिवाजीनगर 11.8, 
  • पाषाण 10.8,
  • वडगाव शेरी 19.6, 
  • एनडीए 11.5,
  • मगरपट्टा 18.8,
  • लवळे 16.2 ,
  • तळेगाव 13.8 ,
  • चिंचवड 17.6 

याबरोबरच राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी असा विकेंडला पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद आणि लातूर या सहा जिल्ह्यांत शनिवारी पाऊस येण्याची शक्यता आहे याशिवाय रविवारी राज्यातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हे ही वाचा

VIDEO: साहेब, हातजोडून विनंती आहे सातवा वेतन आयोग लागू करा, नाही तर आज 37 गेले, उद्या 370 होतील; एसटी कामगारांचा ‘कृष्णकुंज’वर टाहो

नवाब मलिकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, त्यांची NIA चौकशी व्हावी, चंद्रकांत पाटील यांची मागणी

दागिने घ्यायच्या म्हणून आल्या, सोन्याच्या 90 नथी घेऊन पळाल्या, चोरीचा CCTV व्हिडीओ पाहाच

Published On - 2:03 pm, Thu, 11 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI