राज्यातील लोकांची कर्नाटक सीमेवर कडक अडवणूक, पण कर्नाटकचे ड्रायव्हर-कंडक्टर विनामास्क महाराष्ट्रात!

एकीकडे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी केली जात आहे. पण दुसरीकडे कर्नाटक बस डेपोचे ड्रायव्हर कंडक्टर महाराष्ट्रात आल्यावर कोरोना नियमांचे पालन करत नसल्याचं पाहायला मिळत आहे.

राज्यातील लोकांची कर्नाटक सीमेवर कडक अडवणूक, पण कर्नाटकचे ड्रायव्हर-कंडक्टर विनामास्क महाराष्ट्रात!

इचलकरंजी : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे कर्नाटक सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून सीमेवर पोलीस तैनात केले आहेत. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रत्येक गाडीची तपासणी केली जात आहे. ज्या प्रवाशाकडे 72 तासाच्या आतील कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असेल अशाच प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.(driver and conductor of Karnataka bus depot do not follow the corona rules)

एकीकडे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी केली जात आहे. पण दुसरीकडे कर्नाटक बस डेपोचे ड्रायव्हर कंडक्टर महाराष्ट्रात आल्यावर कोरोना नियमांचे पालन करत नसल्याचं पाहायला मिळत आहे. इचलकरंजी बस स्थानकावर कर्नाटक डेपोचे ड्रायव्हर आणि कंडक्टर विना मास्क सर्वत्र वावरत असल्याचं पाहायला मिळालं. आमच्या प्रतिनिधींनी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली.

कर्नाटक सरकारचा निर्णय काय?

महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना कर्नाटक सरकारने प्रवेशबंदी केली आहे. केवळ 72 तासाच्या आतील कोरोना निगेटिव्ह असलेल्यांनाच कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक सरकारकडून प्रत्येक प्रवाशांची कसून चौकशी केली जात आहे. ज्यांचा अहवाल निगेटिव्ह असेल त्यांनाच कर्नाटकात प्रवेश दिला जातोय. पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तींना परत पाठवले जात आहे. कोगनोळी नाक्यावर या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. त्यामुळे अचानक तपासणी सुरू करण्यात आल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय होत आहे. या प्रवाशांना रांगेत तास न् तास अडकून राहवं लागत आहे. तसेच काही प्रमाणात वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील संतापले

महाराष्ट्रातील नागरिकांना कर्नाटकमध्ये प्रवेशबंदी केल्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील कर्नाटक सरकारच्या आडमुठेपणावर संतापले आहेत. महाराष्ट्रातील नागरिकांना कर्नाटकात प्रवेशबंदी करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटलं याहे. “कोरोना संसर्ग वाढत असला तरी, महाराष्ट्रतील नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट करुन त्यांना कर्नाटकमध्ये प्रवेश द्यावा. कर्नाटक सरकार आडमुठी भूमिका घेत असेल तर आम्हालादेखील कर्नाटकचे प्रवाशी महाराष्ट्रात घेताना विचार करावा लागेल. कर्नाटक सरकारच्या या भूमिकेबाबत मी केंद्राला माहिती देणार आहे,” असे सतेज पाटील म्हणाले. तसेच, कर्नाटक सरकारने प्रवाशांची कोरोना चाचणी करून त्यांना क्वॉरन्टाईन करावं, आम्हाला काहीही हरकत नाही, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या :

कोरोनाचा कहर वाढला; महाराष्ट्रातील प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश बंदी!

… तर आम्हालाही कर्नाटकचे प्रवासी रोखण्याचा विचार करावा लागेल; सतेज पाटील भडकले

driver and conductor of Karnataka bus depot do not follow the corona rules

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI