Medha Kulkarni : ‘नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव..’, मेधा कुलकर्णी यांच्यावर प्रहार
Medha Kulkarni : पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या वादावर आता पोस्टर वॉर सुरू झालय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून शहरात विविध ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे.

भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी दोन दिवसांपूर्वी पुणे रेल्वे स्थानकाच नाव बदलण्याची मागणी केली होती. त्यांनी पुणे रेल्वे स्थानकाच नाव बदलून बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याची मागणी केली होती. मेधा कुलकर्णी यांनी ही मागणी केल्यानंतर आता त्याचे राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. मेधा कुलकर्णी यांच्यावर समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून जोरदार टीका झाली. पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या वादावर आता पोस्टर वॉर सुरू झालय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून शहरात विविध ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर बॅनरच्या माध्यमातून टीका केली आहे.
“कोथरूडच्या बाई आपणास नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा” अशा आशयाचे बॅनर शहरात विविध ठिकाणी झळकले आहेत. महत्त्वाच म्हणजे बाजीराव पेशवे यांचं शनिवारवाड्यात वास्तव्य होतं. त्याच शनिवारवाड्याजवळ बॅनर लागले आहेत. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणाच चर्चा सुरु आहे.
मेधा कुलकर्णी यांनी अशी मागणी का केली?
सोमवारी 23 जून रोजी पुणे आणि सोलापूर रेल्वे डिवीजनची बैठक बोलवण्यात आली होती. अनेक संघटनांनी पुणे रेल्वे स्टेशनच नाव बदलून बाजीराव पेशवे करण्याची मागणी केली आहे. ‘मी फक्त त्या मागणीची पुनरुच्चार केला’ असं भाजप खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या. लोकांना पुण्याचा गौरवशाली इतिहास माहित व्हावा, हा आपला त्या मागणीमागे उद्देश आहे असं खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या. “पुणे एक सांस्कृतीक आणि शैक्षणिक केंद्र आहे. पुणे आयटी इंडस्ट्रीसाठी सुद्धा ओळखलं जातं. पण पुण्याबरोबरच अन्य राज्यातील, शहरातील लोकांनी या शहराचा इतिहास जाणून घ्यावा” असं त्या म्हणाल्या.
