उंडाळकर घराण्याचं अखेर मनोमिलन; ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकत्र

कराड दक्षिणच्या राजकारणावर गेल्या 50 वर्षाहून अधिक काळ अधिराज्य गाजवणाऱ्या उंडाळकर घराण्याचं पुन्हा मनोमिलन झालं आहे. (Vilasrao Patil-Undalkar and jaysing patil both Came Together)

उंडाळकर घराण्याचं अखेर मनोमिलन; ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकत्र
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 7:57 PM

कराड: कराड दक्षिणच्या राजकारणावर गेल्या 50 वर्षाहून अधिक काळ अधिराज्य गाजवणाऱ्या उंडाळकर घराण्याचं पुन्हा मनोमिलन झालं आहे. पाच वर्षापूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून विलासराव पाटील उंडाळकर आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू जयसिंगराव पाटील यांच्यात झालेला अबोला मिटला आहे. तोही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातूनच. त्यामुळे कराड दक्षिणमधील राजकीय समीकरणं पुन्हा एकदा बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. (Vilasrao Patil-Undalkar and jaysing patil both Came Together)

दक्षिण कऱ्हाडमध्ये विलासराव पाटील उंडाळकर (काका) आणि त्यांचे बंधू जयसिंगराव पाटील (बापू) यांची जोडी राम-लक्ष्मणाची जोडी म्हणून प्रसिद्ध होती. काकांनी राज्य स्तरावरचं राजकारण पाह्यचं आणि बापूंनी गाव-वाडी वस्त्यांवर संपर्क ठेवायचा असं या दोघांच्या राजकारणाचं सूत्रं होतं. दोन्ही भावांचा सत्तेची समीकरण जुळवण्यात आणि मतदारांशी संपर्क ठेवण्यात हातखंडा असल्याने दक्षिण कऱ्हाडमध्ये शिरकाव करण्यास कुणालाही वाव नव्हता. मात्र, या दोन्ही भावांच्या प्रेमात माशी शिंकली आणि पाच वर्षापूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही भाऊ आमनेसामने उभे ठाकले होते. दोघांनीही परस्परांच्या उमेदवारांविरोधात उमेदवार दिले होते.

मात्र, यंदाच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही भावांमध्ये समन्वय झाला आहे. दोघांनीही हा गावपातळीवरील किरकोळ विरोध दूर सारून पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. उंडाळकर घराण्यात मनोमिलन झाल्याने गावकरीही समाधानी झाले असून गावाने उंडाळकर घराण्यातील उदयसिंह पाटील आणि राजाभाऊ पाटील हे नवं नेतृत्व स्वीकारल्याचं चित्रं आहे.

चव्हाण-उंडाळकरांची दिलजमाई!

दरम्यान, या आधी काँग्रेस पक्षात राहून कट्टर विरोधक असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांची अखेर दिलजमाई झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी हे दोन्ही नेते एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते. त्यावेळी या दोघांमधील वैर संपुष्टात आलं. व्हाण आणि उंडाळकर यांची दिलजमाई झाल्यानंतर उदयसिंह उंडाळकर आता पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचं काम करणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उदयसिंह यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. (Vilasrao Patil-Undalkar and jaysing patil both Came Together)

संबंधित बातम्या:

कट्टर विरोधक एकत्र, पृथ्वीबाबा-विलासकाका उंडाळकर यांची दिलजमाई, सातारा काँग्रेसची ताकद वाढणार

साताऱ्यात निवडून यायला पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांची मदत घ्यावी लागते : सामना

चव्हाण-उंडाळकरांची दिलजमाई!, उदयसिंह उंडाळकर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

(Vilasrao Patil-Undalkar and jaysing patil both Came Together)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.