पुण्यात पर्यटनस्थळी कलम 144 लागू, मात्र पर्यटकांकडून आदेशाचं उल्लंघन सुरुच

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळाच्या ठिकाणी कलम 144 लागु करण्याचे आदेश दिलेत. मात्र, तरीही अनेक पर्यटक या आदेशाचे उल्लंघन करत आहेत.

पुण्यात पर्यटनस्थळी कलम 144 लागू, मात्र पर्यटकांकडून आदेशाचं उल्लंघन सुरुच
पुण्याचा पाणीकोटा वाढला
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 4:07 AM

पुणे : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळाच्या ठिकाणी कलम 144 लागु करण्याचे आदेश दिलेत. मात्र, तरीही अनेक पर्यटक या आदेशाचे उल्लंघन करत आहेत. आषाढी एकादशीची सुट्टी आणि रिमझिम पडणारा पाऊस यामुळे अनेक पर्यटक खडकवासला धरणाच्या परिसरात गर्दी करत असल्याचं चित्र आहे.

मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर प्रथमच खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांत दमदार पावसाने हजेरी लावली. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी रात्री आणि सोमवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे चारही धरणांत मिळून पाणीसाठा 11.3 टीएमसी इतका झालाय. गेल्यावर्षी आजच्याच दिवशी धरणात 9.47 टीएमसी पाणीसाठा होता.

पिंपरी-चिंचवड महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रातही दमदार पाऊस झाला आहे. गेल्या 24 तासात याठिकाणी 60 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 1 जूनपासून या परिसरात तब्बल 798 मिमी पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी याच काळात पवना धरणक्षेत्रात 484 मिमी पाऊस झाला होता. सध्या पवना धरण 40.44% टक्के भरले आहे. गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात 2.59 टक्के तर 1 जूनपासून पाणीसाठ्यात 8.85 टक्के इतकी वाढ झाली आहे.

मुंबईतील तलावक्षेत्रातही मुसळधार पाऊस

डोक्यावर पाणीकपातीची टांगती तलवार असलेल्या मुंबईकरांनाही नुकत्याच झालेल्या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा 1 लाख 28 हजार दशलक्ष लिटरने वाढला आहे.

तलाव पाणीसाठा दशलक्ष लिटरमध्ये

मोडकसागर – 66,092 तानसा- 78,467 मध्य वैतरणा- 37,551 भातसा- 1,97,321 तुळशी- 8,046 विहार- 27,698

हेही वाचा :

VIDEO : ‘गाडीत असताना उद्घाटन न करताच निघून जावं वाटलं, पण…’, पुण्यातल्या तुफान गर्दीवर अजित पवार यांची रोखठोक भूमिका

डॉ. आंबेडकर जयंतीला अभिवादनाचे कार्यक्रम साधेपणाने करा, गर्दी नकोच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘पुण्याच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात येण्याआधी मी काळजीत होतो’, गर्दीवरुन शरद पवारांची टोलेबाजी

व्हिडीओ पाहा :

Violation of article 144 near Khadakwasla in Pune

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.