AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime : पांढऱ्याशुभ्र फरशीवर रक्ताचा सडा ! आधी मुलाला मारलं, मुलीकडे धाव घेताच… आई बनली हत्यारीण; पुणे हादरलं

पुण्यातील वाघोली येथे एका मातेने आपल्याच दोन मुलांवर जीवघेणा हल्ला केला. या घटनेत ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला असून, १३ वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. आरोपी आई सोनी संतोष जायभायला अटक करण्यात आली असून, हल्ल्याचे कारण अस्पष्ट आहे. या हृदयद्रावक घटनेने पुणे हादरले असून, परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

Pune Crime : पांढऱ्याशुभ्र फरशीवर रक्ताचा सडा ! आधी मुलाला मारलं, मुलीकडे धाव घेताच... आई बनली हत्यारीण; पुणे हादरलं
भयानक हत्याकांडाने पुणं हादरलंImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jan 27, 2026 | 12:30 PM
Share

घार उडते आकाशी, चित्त तिचे पिलांपाशी..! आई.. कुठेही असली तरी आपली मुलं, बाळं सुखरूप आहेत ना याकडेच तिचं नेहमी लक्ष असतं. पण काही वेळा असं काही घडतं की नात्यांवरचा, प्रेमावरचा विश्वास उडेल की काय, त्याला तडा जाईल की असं वाटावं अशी परिस्थिती समोर येते. आई म्हणून हाक मारायला भीती वाटावी अशी एक अत्यंत भयानक घटना गजबजलेल्या पुण्यात घडली आहे. पुण्यातील वाघोलीत एक हत्याकांड झालंय. आणि तो हल्ला केला आहे चक्क एका आीन.. तोही आपल्याच पोटच्या गोळ्यांवर, तिच्याच मुलांवर…

हो , वर लिहीलेलं अक्षर अन् अक्षर खरं आहे, पुण्यातील वाघोली परिसरातील बाईफ रोडवर एका महिलेने तिच्या दोन मुलांवर हल्ला (Pune Crime) केला. 11 वर्षांच्या मुलाचा यात मृत्यू झाला तर 13 वर्षांची तिची मुलगी गंभीर जखमी झाली असून रुग्णालयात जीवन-मृत्यूच्या उंबरठ्यावर असून जगण्यासाठी झुंज देत आहे. सोनी संतोष जायभाय असे हल्लेखोर महिलेचे, त्या आईचं नाव असून पोलिसांनी तिला अटक करून तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे सुसंस्कृत, सुशिक्षितांचं शहर म्हणून नावलौकिक असलेलं पुणं प्रचंड हादरलं असून परिसरातील नागरिकही दहशतीत आहेत.

मुलाचा गळा चिरला, मुलीवरही केले सपासप वार

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मिहाल सोनी संतोष जायभाय ही मूळची पुण्याची नाही. ती नांदेडच्या कंधार येथील रहिवासी असून काही काळापासून पुण्यातल्या बाईफ रोडवरच्या एका इमारतीत तिच्या कुटुंबासह राहते. या घटनेत तिचा 11 वर्षांचा मुलगा साईराज याचा मृत्यू झाला. तर त्याची मोठी बहीण,13 वर्षांची धनश्री ही गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सोनी यांच्या घरात घडलेल्या हत्याकांडानंतर शेजाऱ्या-पाजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं. ते घटनास्थळी दाखल झाले तेव्हा संपूर्ण घरात, पांढऱ्या शुभ्र फरशीवर रक्ताचा सडा पडेलला होता. 11 वर्षांचा मुलगा मृतावस्थेत जमिनीवर होता, तर मुलगी गंभीर जखमी होती. सोनी यांनी त्यांच्या 11 वर्षांच्या मुलाची गळा चिरून हत्या केली, तर मुलगी धनश्री हिच्यावर सपासप वार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा आवाज ऐकून शेजारी धावत आले पण समोरचं दृश्य पाहू दारातच थबकले. कोणीतरीह पोलिसांन कळवल्यावर, पोलिसांचं पथक घटनास्थी आलं, त्यांनी जखमी मुलीला उपचारांसाठी रुग्णालयात हलवल. तर मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

मुलांवर का केला हल्ला ?

मुलांवर हल्ला करणाऱ्या सोनीला पोलिसांनी अटक केली असून तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र तिने नेमकं हे कृत्य का केलं, आपल्याच मुलाला का मारलं, मुलीवर प्राणघातक हल्ला का केला ? याचं कारण अजून समोर आलेलं नाही. पोलिसांनी तिची चौकशी सुरू केली आहे असून भयानक हत्येच कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या गुन्हेगारी घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे . निष्पाप मुलाच्या हत्येमुळे आणि मुलीवर झालेल्या हल्ल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी.
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस.
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट.
पुन्हा परीक्षा पे चर्चा, भारतात किती विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग?
पुन्हा परीक्षा पे चर्चा, भारतात किती विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग?.
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख..
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख...
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?.
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.