AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | सिंहगडाचा बकालपणा घालवण्यासाठी काय करणार? अजित पवारांनी दौऱ्यानंतर प्लॅन सांगितला

प्रशासकीय अधिकारी आणि नेते मंडळी, शिवप्रेमी आलेत, सगळ्यांनी पाहणी केलीय. किल्ल्याला कुठल्याही प्रकारची बाधा न आणता वयस्कर लोकांसाठी रोप वे चा प्रस्ताव आणणार, असेही अजित पवार यांनी पुढे नमूद केले.

VIDEO | सिंहगडाचा बकालपणा घालवण्यासाठी काय करणार? अजित पवारांनी दौऱ्यानंतर प्लॅन सांगितला
सिंहगडाचा बकालपणा घालवण्यासाठी काय करणार?
| Edited By: | Updated on: Oct 01, 2021 | 10:40 PM
Share

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सिंहगडाची पाहणी केली. माझा सिंहगड माझा अभिमान अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अजित दादांनी पर्यावरणाचा विचार करून पर्यटनाच्या दृष्टीने सिंहगडाचा विकास करण्यासाठी प्लान सांगितला. सिंहगडावर ट्राफिक होतं. त्यामुळे इलेक्ट्रिक बसचा पर्याय, आज pmpl च्या ट्रायल बसने आज आम्ही आलो. येथे वेगवेगळ्या टपऱ्या आहेत. कुणीही कशाही पद्धतीने टपऱ्या लावल्या आहेत. त्यामुळे बकालपणा आलाय, आम्हाला त्यांच्या रोजी रोटीवर परिणाम होऊ द्यायचा नाही. त्यांच्यावर अन्याय होऊ द्यायचा नाही. सध्या 71 स्टॉल्स आहेत. पण चांगल्या प्रकारे कसं करता येईल यासाठी प्रयत्न करू, असे अजित पवार यांनी सांगितले. (What will Singhgad do to get rid of his uselessness, Ajit Pawar announced the plan after the tour)

काय म्हणाले अजित पवार?

अतिक्रमणे झाली असतील तर ती काढली जाणार. जिल्हा परिषदेचे गेस्ट हाऊस चुकीच्या पद्धतीने झाले आहे ते काढून टाकू. राज्यात किल्ले गड सर्वाधिक आहे, ते कसे जतन करता येतील याचा प्रयत्न करु. Vip असो किंवा vvip असो कुणाचेही वाहन वर येणार नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने किती सीटची बस असावी याचा विचार करून निर्णय घेऊ. आजूबाजूच्या गावातल्या लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा उद्देश आहे. चांगल्या प्रकारे चुना बाजरी घडाई वापरुन काम करु. गडावर आणखी झाडं लावण्याचा प्रयत्न करु. प्रशासकीय अधिकारी आणि नेते मंडळी, शिवप्रेमी आलेत, सगळ्यांनी पाहणी केलीय. किल्ल्याला कुठल्याही प्रकारची बाधा न आणता वयस्कर लोकांसाठी रोप वे चा प्रस्ताव आणणार, असेही अजित पवार यांनी पुढे नमूद केले. यावेळी अजित पवार यांना शेवटचे सिंहगडावर कधी आले होते असा प्रश्न विचारला असता, माझी चूक झाली की मागच्या वेळी गेस्ट हाऊसची फीत कापायला आलो होतो. पण आता मागचं कशाला उकरुन काढता? असं अजित दादा म्हणाले.

महाविकास आघाडीत सगळे समजूतदार

आशिष शेलार यांनी मावळमधील कार्यक्रमात म्हटले होते की, महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्ये जी भांडण सुरु झालंय. त्यामुळे लवकरच निवडणुका लागतील. मागे भाजपचं सरकार होतं. सगळ्या प्राण्यांची आठवण केली होती. निवडणुकीत बोलायचं असतं आणि विसरुन जायचं. आता तीच त्यांनी पद्धत ठेवली आहे. आम्ही वाघ, सिंह असे करणार नाही. आमच्या महाविकास आघाडीत उध्दव ठाकरे, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण सगळे समजूतदार आहे आम्ही समजून घेतो. सरकार त्यांचं नाही याची त्यांना खंत आहे. हे त्यांचं दुःख आहे, त्यामुळे अशा प्रकारची गरळ ओकायची सवय लागलेय. आपली मुदत संपल्यावर आपल्याला समाधान मिळावं की आपल्या कारकीर्दीत एवढी अपेक्षा आहे.

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीत कुठलीही नाराजी नाही

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीत कुठलीही नाराजी नाही. मी लक्ष घातले की पवार साहेबांना लक्ष घालावे लागत नाही. मी 92 सालापासून इथे राजकारण करतोय. मी कधीही गटातटाचं राजकारण केलं नाही. मी नेहमी नवे चेहरे काही प्रमाणात आणण्याचा प्रयत्न करतो. जुन्या अनुभवी आणि नव्यांचा मिलाप घालण्याचा प्रयत्न करतो. सारथी संदर्भात बैठक झाली. प्रेझेंटेशन देण्यात आले. सारथीमधे अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्यात पण त्यांना रुजु करुन घेतले जात नाही कारण त्यासाठी तज्ज्ञांची समिती आहे. सारथीला स्वायत्तता आहे. सारथीला काही कमी दिले जाणार नाही. (What will Singhgad do to get rid of his uselessness, Ajit Pawar announced the plan after the tour)

इतर बातम्या

Mumbai School Reopen : आठवड्यात तीन दिवस निर्जंतुकीकरण, पालकांच्या संमतीपत्रानंतरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश : किशोरी पेडणेकर

ओझरखेड डावा कालव्याची कामे जलसंपदाच्या बांधकाम शाखेमार्फत तात्काळ पूर्ण करावीत : छगन भुजबळ

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.