“जातीत लग्न करा असे ठरवणारे हे कोण?;” खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल

लग्नाबद्दल जातीत लग्न करा, असे तुम्ही कोण ठरवणारे ? असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी सभेस बसलेल्या मुलींना तुम्हाला चालेल का आम्ही लग्न ठरवलेले असे विचारले.

जातीत लग्न करा असे ठरवणारे हे कोण?; खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल
सुप्रिया सुळे
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 9:11 AM

पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांची इंदापूर तालुक्यातील माळवाडी येथे जाहीर सभाझाली. या सभेत त्यांनी राज्य सरकारचा चांगलाच समाचार घेतला. जातीत लग्न करा, असं सांगणारे हे कोण, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री आणि आमदार दत्तात्रय भरणे यांना विचारला. आम्ही आमच्या मुलींचे लग्न कोणत्या जातीत करायचं किंवा कुणाशी करायचं हे सांगण्याचा त्यांना अधिकार नसल्याचंही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजपवाले सतत उलटे लोकांना सांगत आहेत. लग्नाबद्दल जातीत लग्न करा, असे तुम्ही कोण ठरवणारे ? असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी सभेस बसलेल्या मुलींना तुम्हाला चालेल का आम्ही लग्न ठरवलेले असे विचारले.

मुलीच्या लग्नाच्या निर्णयप्रक्रियेत कोण असेल

आपल्या रेवती या मुलीचे लग्न माझे पती सदानंद आणि मी ठरवू. अजित दादा रेवतीचा मामा आहे म्हणून ठरवेल तिचं लग्न कोणाशी करायचं. आमदार दत्तात्रय भरणे मामा व राज्याचे मुख्यमंत्री हे नाही सांगू शकत की रेवतीचं लग्न कुणाशी करायचं. सुप्रिया सुळे आता मुख्यमंत्री आहोत तुमची मुलगी ह्याच्याशी लग्न करेल, असं नाही सांगू शकत. आमच्या मुली आता शिकलेल्या आहेत. त्या स्वतःचे निर्णय स्वतः घेतील. माझी मुलगी काय खाईल. कोणाशी लग्न करेल ती कसं जगेल, हे आम्ही कुटुंब ठरवू. किंवा ती निर्णय प्रक्रियेत असेल, असं स्पष्टपणे सुप्रिया सुळे यांनी सुनावलं.

आमचा लढा संविधानासाठी

भारतीय जनता पार्टीला आम्ही तो अधिकार दिलेला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील तो कोणालाही अधिकार दिलेला नाही. जे राज्यात चालले आहे ते आपल्या देशाच्या राज्याच्या, समाजाच्या आणि संविधानाच्या विरोधात चालले आहे. माझा लढा हा त्यांच्यासाठी नसून संविधानासाठी आहे, असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या इंदापूर तालुक्यातील माळवाडी येथे जाहीर सभेत बोलत होत्या. यावेळी त्या आक्रमक दिसल्या. यावेळी त्यांनी भाजपलाही सुनावलं. एकंदरित वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करू नका. तुम्ही राज्याचे प्रमुख असलात म्हणून काय झालं, असं त्यांना म्हणायचं होते.

Non Stop LIVE Update
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.