Pune : कौलारू छत अंगावर कोसळलं; पुण्यातल्या जवळे गावच्या दुर्दैवी घटनेत माजी महिला सरपंचाचा मृत्यू

रंगुबाई काळे या ठाकर समाजाच्या माजी महिला सरपंच होत्या. त्या जवळे गावातील लायगुडे मळा येथे राहत. त्यांच्या घराच्या शेजारीच त्यांचे जुने कौलारू शेड आहे. दुपारी दोन वाजता त्या शेडमध्ये गेल्या असताना अचानक शेडचे छप्पर कोसळून त्यांच्या अंगावर पडले.

Pune : कौलारू छत अंगावर कोसळलं; पुण्यातल्या जवळे गावच्या दुर्दैवी घटनेत माजी महिला सरपंचाचा मृत्यू
घराचं छत कोसळून रंगुबाई काळे यांचा मृत्यूImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 7:56 PM

आंबेगाव, पुणे : जोरदार पावसाने (Heavy rain) घराच्या शेजारी असलेले कौलारू छप्पर कोसळून माजी सरपंच महिलेचा मृत्यू झाला आहे. आंबेगाव तालुक्यातील जवळे येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. रंगुबाई धोंडीभाऊ काळे (वय 46) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. काळे या जवळे गावाच्या माजी सरपंच होत्या. छप्पर कोसळून त्यांच्या अंगावर पडले. त्यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर मार (Seriously injured) लागल्याने यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, की रंगुबाई काळे या ठाकर समाजाच्या माजी महिला सरपंच होत्या. त्या जवळे गावातील लायगुडे मळा येथे राहत. त्यांच्या घराच्या शेजारीच त्यांचे जुने कौलारू शेड आहे. दुपारी दोन वाजता त्या शेडमध्ये गेल्या असताना अचानक शेडचे छप्पर कोसळून (The roof of the shed collapsed) त्यांच्या अंगावर पडले.

डॉक्टरांनी मृत घोषित केले

छप्पर कोसळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्या खाली पडल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या शेजारी राहत असलेल्या इंदुबाई रमेश गावडे या महिलेने आरडाओरडा करत स्थानिक लोकांना गोळा केले असता महेश लोखंडे यांनी त्यांच्या गाडीतून मंचर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तपासणी करून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रंगुबाई काळे यांच्या घरातील सदस्य कामानिमित्त बाहेर गेले असताना ही घटना घडली आहे.

हे सुद्धा वाचा

मागील तीन-चार दिवसांच्या पावसामुळे छत झाले होते कमकुवत

गेल्या तीन-चार दिवसांपासून सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे त्यांच्या घराचे जुने कौलारू शेड कमकुवत झाल्यामुळे ते कोसळले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भीमाशंकर साखर कारखान्याचे संचालक बाबासाहेब खालकर, अंकुश गायकवाड, पोलीस पाटील रवींद्र लोखंडे, तलाठी भाऊसाहेब विश्वनाथ मुगदळे, शेखर खालकर, प्रदीप लायगुडे, सचिन गावडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस पाटील यांनी याबाबत तहसीलदार, पोलीस प्रशासन यांना माहिती दिली. दरम्यान, अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा असून हळहळ व्यक्त होत आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.