फी मागणी करत विद्यार्थ्यांचे अर्ज नाकारणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करा, युक्रांदची मागणी

एकीकडे कोरोनाचं संकट दुसरीकडे पालकांचं उत्पन्न ठप्प झालेलं असताना अनेक महाविद्यालयं विद्यार्थ्यांकडून फीची मागणी करत आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांचे विद्यापीठाचे अर्ज देखील नाकारले जात आहेत.

फी मागणी करत विद्यार्थ्यांचे अर्ज नाकारणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करा, युक्रांदची मागणी
Follow us
| Updated on: Jun 09, 2021 | 3:45 AM

पुणे : एकीकडे कोरोनाचं संकट दुसरीकडे पालकांचं उत्पन्न ठप्प झालेलं असताना अनेक महाविद्यालयं विद्यार्थ्यांकडून फीची मागणी करत आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांचे विद्यापीठाचे अर्ज देखील नाकारले जात आहेत. याच मुद्द्यावर युवक क्रांती दल (युक्रांद) संघटनेने आज (8 जून) उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांची भेट घेत महाविद्यालयीन फी कमी करण्याची मागणी केलीय. “सरकारने विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्याचे परिपत्रक काढूनही महाविद्यालयं विद्यार्थ्यांना नाहक त्रास देत आहेत. याबाबत तातडीने लक्ष घालून अशा महाविद्यालयांवर कारवाई करावी. तसेच विद्यार्थ्यांची चालू शैक्षणिक वर्षातली फी कमी करावी,” अशी मागणी युक्रांदने केलीय (Yuvak Kranti Dal demand action on colleges forcing student to pay fee amid corona in Pune).

युक्रांदने आपल्या निवदेनात म्हटलं आहे, “मार्च 2020 पासून देशावर करोनाचे मोठे संकट आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव आहे. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. उद्योगधंदे, व्यवसाय बंद आहेत. बर्‍याच पालकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. शेतीतील उत्पन्न अल्प आहे. अशातच गेल्या एक वर्षापासून विद्यार्थ्याचे शिक्षण Online पद्धतीने चालू आहे. विद्यार्थी एकही दिवस कॉलेजला गेले नाहीत. कोणत्याही साधनसामुग्रीचा वापर विदयार्थ्यांनी केला नाही, परंतु महाविद्यालयांकडून संपूर्ण फी मात्र आकारली जात आहे. यामध्ये Maintenance charges, Laboratory fee, Gym fee, Computer lab fee, Uniform fee, Study Material, Stationary fee, Internet charges, Field work, Extra-curricular activities, Vehicle charges असे अनेक प्रकारचे शुल्क आकारले जात आहेत.”

विद्यार्थ्यांना नाहक त्रास देणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाईची मागणी

“आता विद्यार्थ्यानी फी भरावी यासाठी महाविद्यालये दबाव टाकत आहेत. फी न भरल्यास फॉर्म इनवर्ड करून घेणार नाही किंवा internal exam ला बसू देणार नाही अशी धमकी वजा भाषा वापरली जात आहे. विद्यापीठाचे फॉर्म इनवर्ड करण्याबाबतचे परिपत्रक असून देखील याबाबत महाविद्यालयं विद्यार्थ्यांना नाहक त्रास देत आहेत. याबाबत आपण तातडीने लक्ष घालून अशा महाविद्यालयांवर कारवाई करावी. तसेच विद्यार्थ्यांची चालू शैक्षणिक वर्षातली फी कमी करावी,” अशी मागणी युक्रांदने केलीय.

“अर्ज न स्वीकारणाऱ्या महाविद्यालयांची माहिती द्या”

युवक क्रांती दलाकडून डॉ. धनराज माने संचालक उच्च व तंत्र शिक्षण यांची भेट घेऊन महाविद्यालयीन फी कमी करावी व परीक्षा अर्ज inward करुन न घेणाऱ्या महाविद्यालयावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. याबाबत शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी युक्रांदने चर्चा केलीय. त्यांनी लवकरच यावर धोरणात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगितलंय. तसेच परीक्षा अर्ज न स्वीकारणाऱ्या महाविद्यालयांची आणि विद्यार्थ्यांची माहिती देण्यास सांगितले आहे.

युक्रांदने पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे डॉ. महेश काकडे यांचीही भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या अडचणी मांडल्या. यावर जे महाविद्यालये विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज inward करणार नाही, अशा महाविद्यालयांवर कारवाई केली जाणार असल्याचं आश्वासन काकडे यांनी दिलं. त्यांनी युक्रांदला अडवणूक करणाऱ्या महाविद्यालयांची माहिती देण्यास सांगितले आहे. यावेळी युवक क्रांती दलाचे राज्य संघटक जांबुवंत मनोहर, शहराध्यक्ष सचिन पांडुळे, विद्यार्थी प्रतिनिधी झुबेर चकोली, सागर आवटे, युक्रांद पुणे शहर उपाध्यक्ष कमलाकर शेटे उपस्थित होते.

हेही वाचा :

खासगी शाळांना फीवरुन विद्यार्थ्यांना शाळेतून काढता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

कोरोना वाढत असतानाही शाळा भरली, केडीएमसीकडून कारवाई

व्हिडीओ पाहा :

Yuvak Kranti Dal demand action on colleges forcing student to pay fee amid corona in Pune

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.