त्या दुर्दैवी घटनेनंतर… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावना केल्या व्यक्त, मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
CM Devendra Fadnavis Rajkot : मालवणमधील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी या पुतळ्याची वैशिष्ट्ये सुद्धा सांगितली.

कोकणातील मालवणमधील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांनी राजकोट येथील पुतळा कोसळ्याच्या त्या दुर्देवी घटनेचा उल्लेख करत, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आपण आणि अजितदादांनी पुन्हा याच ठिकाणी पुतळा पुन्हा दिमाखात उभारण्याचा निर्धार केला होता, हे सांगितले. त्यांनी यावेळी या पुतळ्याचे वैशिष्ट्ये सांगितले.
देशातील सर्वात उंच पुतळा
शिल्पकार सुतार यांनी उत्तम पुतळा तयार केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कोकणात वेगवेगळ्या प्रकारचे तुफान येतात. वादळं येतात. या सर्वांचा अभ्यास करून. त्यापेक्षा अधिक सोसाट्याचा वारा, वादळ आले तरी हा पुतळा तसाच उभा राहिल, असे त्यांनी स्पष्ट केले. हा पुतळा जवळपास 91 फुटाचा आहे. त्यात 10 फुटाचे पेडेस्ट्रॉल आहे. हा देशातील महाराजांचा सर्वात उंच पुतळा असल्याचे ते म्हणाले. पुढील किमान 100 वर्ष हा पुतळा कुठल्याही प्रकारच्या वातावरणात टिकेल अशा प्रकारची याची रचना करण्यात आली आहे. तर त्याचे देखभालीचे काम ज्यांनी पुतळा तयार केला, त्यांच्याकडे पुढील 10 वर्षे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यासंबंधीची हमी त्यांनी घेतली आहे.
लवकरच आजुबाजूचा परिसर संपादित करून शिवसृष्टीच्या धरतीवर काम करण्यात येणार आहे. पर्यटकांना छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा अनुभव या ठिकाणी घेता येईल, असे काम करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. हा परिसर लवकरच विकसीत करण्यात येईल असे ते म्हणाले. नितेश राणे यांनी आसपासच्या जमीन मालकांशी यासंदर्भात चर्चा केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री नारायण राणे, नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कोकणाला यापूर्वीच्या अडीच वर्षाच्या महायुतीच्या कार्यकाळात झुकते माप देण्यात आले. आता सुद्धा कोकण विकासासाठी काम करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. नुकताच मच्छिमारांना शेतकऱ्यांना प्रमाणे दर्जा देण्यात आल्याची आठवण त्यांनी करून दिली. तर पाकिस्तानशी तणाव पाहता वॉर बुकप्रमाणे सर्व खबरदारी घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
