AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raju Shetti : हे सरकार हार-तुरे अन् उत्सवांमध्येच व्यस्त, विरोधकही काहीच बोलत नाहीत; राजू शेट्टींचा घणाघात

परभणी शहरातील संत तुकाराम महाविद्यालय येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या मोर्चात (Morcha) मोठ्या प्रमाणात शेतकरी ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले. यावेळी राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली.

Raju Shetti : हे सरकार हार-तुरे अन् उत्सवांमध्येच व्यस्त, विरोधकही काहीच बोलत नाहीत; राजू शेट्टींचा घणाघात
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Sep 13, 2022 | 3:16 PM
Share

परभणी : हे सरकार हार-तुरे आणि उत्सवांमध्ये व्यस्थ आहे. त्यांना सामान्य, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचे काहीही पडलेले नाही. त्यात आता विरोधकही काही बोलत नाहीत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. ते परभणीत बोलत होते. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या नेतृत्वाखाली आज परभणीत ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. शहरातील संत तुकाराम महाविद्यालय येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या मोर्चात (Morcha) मोठ्या प्रमाणात शेतकरी ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले. यावेळी राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली. हे सरकार जनतेचे नाही. सामान्यांना मदत होत नसेल, तर हे सरकार काय कामाचे, असा सवालही त्यांनी केला आहे.

‘नैसर्गिक आपत्तीमध्येसुद्धा सरकारकडून दुजाभाव’

राज्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. मात्र अशा नैसर्गिक आपत्तीमध्येसुद्धा सरकारकडून दुजाभाव केला जात आहे. ज्या ठिकाणी विरोधी पक्षाचा आमदार आहे, त्या ठिकाणी तुटपुंजी मदत जाहीर करण्यात आली. तर सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या ठिकाणी भरघोस मदत देण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्येसुद्धा सरकार दुजाभाव करत आहे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

‘मराठवाड्यात प्रचंड नुकसान’

कालपासून मी मराठवाड्यात आहे. कापूस तर पूर्ण नष्ट झालेला आहेच. सोयाबीन आणि मुगाचा पत्ता नाही. 22 ते 28 दिवस पावसाचा मध्ये खंड पडला. त्या काळामध्ये सोयाबीनला पाण्याची गरज होती. मात्र त्याला शेंगही आली नाही. ते केवळ दिसायला हिरवेगार दिसते. अशावेळी प्रशासनाने मदत देणे गरजेचे आहे. 100 कोटींची एफआरपीची थकबाकी आहे. साखर सम्राट मोकाट सुटलेले आहेत. बोगस बियाणे कंपन्यांनी सुळसुळाट घातला आहे. मात्र त्यांच्यावर कृषी विभाग कारवाई करत नाही, अशी टीका त्यांनी केली. दरम्यान, असले सरकार कार्यकाळ पूर्ण करणार किंवा नाही, त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही.

म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.