AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे धांदात खोटं… बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबद्दल रामदास कदमांचा पुन्हा मोठा दावा, म्हणाले, दुसऱ्या माळ्यावर…

रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवर उद्धव ठाकरे यांनी फार काही बोलणे टाळले. मात्र, अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केले. शिवाय 1993 मध्ये काय घडले याबद्दल धक्कादायक खुलासा केला. आता परत रामदास कदम यांनी मोठा दावा केला आहे.

हे धांदात खोटं... बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबद्दल रामदास कदमांचा पुन्हा मोठा दावा, म्हणाले, दुसऱ्या माळ्यावर...
Ramdas Kadam
| Updated on: Oct 05, 2025 | 2:55 PM
Share

रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबद्दल अत्यंत गंभीर आरोप केली. हेच नाही तर या वादात त्यांनी शरद पवार यांना देखील ओढले. रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांनंतर अनिल परब यांनी रामदास कदम आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल धक्कादायक खुलासा केला. रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती कदम यांनी 1993 मध्ये जाळून घेतले होते की, जाळले होते, याचा तपास करा, असे त्यांनी थेट म्हटले. आता पुन्हा एकदा रामदास कदम यांनी आरोप केले असून सीबीआय चाैकशीची मागणी केली. अनिल परब यांनी दावा केला की, बाळासाहेब ठाकरे यांच्याजवळ डॉक्टरांची एक मोठी टीम होती. मात्र, रामदास कदम यांनी स्पष्ट म्हटले की, अनिल परब हा धांदात खोटं बोलत आहे. शेवटची दोन दिवस कोणतीही टीम त्यांच्याजवळ नव्हती आणि बाळासाहेबांना कोणालाही भेटू दिले जात नव्हते.

अनिल परबांनी म्हटले होते की, बाळासाहेबांसोबत डॉक्टरांची टीम होती. शेवटच्या दिवशी सर्व नेते आणि डॉक्टर जनतेसमोर गेले. हे धांदात खोटं आहे. अनिल परब खोटं बोलला. मी दाव्याने सांगतो, शेवटचे दोन दिवस बाळासाहेब दुसऱ्या माळ्यावर होते. तिथे कुणाला जाण्याची परवानगी नव्हती. हा म्हणतो असंख्य लोकं भेटत होते. तो खोटं बोलत आहे, असे रामदास कदम यांनी म्हटले.

पुढे रामदास कदम यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करत आहेत. प्रेस समोर मी फक्त एकटा गेलो होतो. डॉक्टर कोणी नव्हते. मी फक्त एकटा गेलो. मला सांगितलं बाळासाहेब गेले जाहीर करा. मी गेलो. मी जाहीर केलं. कोणीही डॉक्टर नव्हते. हिंमत असेल तर अनिल परबने नावं सांगितली पाहिजे. चौकशी होईल त्यांची. डॉक्टरांनी प्रेस बुलेटिन का काढलं नाही. याचं उत्तर कोण देईन.

तुझा बाप देईन. अनिल परबने जे सांगितलं ते धांदात खोटं आहे. मी फक्त संशय निर्माण केला. याची चौकशी व्हावी म्हटलं. तिथे कोणी डॉक्टर नव्हते. मी फक्त संशय व्यक्त केला. संशय व्यक्त करून चौकशीची मागणी केली तर चूक काय. तू का बोलतो. उद्धव ठाकरे का बोलत नाहीत. बापाच्या बाबतीत कुणी संशय निर्माण केला तर मुलाने बोललं पाहिजे. या दलालाला सांगितलं बोलायला, असेही रामदास कदम यांनी म्हटले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...