AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रत्नागिरीत नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता; 430 रुग्ण खाटांचे होणार रुग्णालय; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय मंत्रिमंडळात हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. या रुग्णालयामुळे जिल्ह्यातील डॉक्टरांचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

रत्नागिरीत नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता; 430 रुग्ण खाटांचे होणार रुग्णालय; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
उदय सामंतImage Credit source: tv9marathi
| Updated on: Aug 11, 2022 | 9:46 AM
Share

रत्नागिरीः शिंदे-फडणवीस सरकारच्या मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत रत्नागिरी येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Government Medical College) आणि महाविद्यालयास संलग्नित जिल्हा सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून 430 रुग्ण खाटांचे जिल्हा रुग्णालय (Ratnagiri District Hospital) स्थापन करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली असून या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. रत्नागिरीमध्ये 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आगामी वर्षीपासून सुरू करण्यासाठी मंत्रिमंडळाकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी 522 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली असून दिल्ली येथे परवानगीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती मंत्रिमंडळातील नूतन मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी दिली.

झूम मिटींगद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रथमदर्शनी जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय व मनोरुग्णालय इमारत आवारात हे शासकीय महाविद्यालय सुरू केले जाणार आहे.

मनोरुग्णालयाची 14 एकर जागा

येथील मनोरुग्णालयाची 14 एकर जागा असून, त्यातील चार एकर जागेत नूतन इमारत व होस्टेल उभा करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक 20 एकर जागा देण्याचा निर्णयही घेण्यात आला असल्याची माहितीही पत्रकार परिषदेत देण्यात आली.

एकूण 522 कोटीच्या निधीला मंजुरी

वैद्यकीय महाविद्यालयाच्या दृष्टीने जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय व मनोरुग्णालय इमारतीच्या किरकोळ दुरुस्तीसाठी 25 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. नवीन इमारतीसाठी 114 कोटी 77 लाख, यंत्रसामग्रीसाठी 120 कोटी असे 259 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. अधिकारी व कर्मचार्‍यांच्या वेतनापोटी तीन वर्षांसाठी 105 कोटी रुपये, 31 कोटी आवर्ती खर्च व अन्य मिळून एकूण 522 कोटीच्या निधीला मंजुरी देण्यात आली असल्याचे माहितीही मंत्री उदय सामंत यांनी दिली. हे वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत तीन वर्षात पूर्ण करण्याचे प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय प्रश्न मार्गी

वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय मंत्रिमंडळात हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. या रुग्णालयामुळे जिल्ह्यातील डॉक्टरांचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रत्नागिरीला शैक्षणिक हब बनवण्याचे आपले स्वप्न असून त्या दृष्टीने सुरु असलेले उपक्रम पूर्ण करण्यावर भर दिला जाणार असून वैद्यकीय महाविद्यालयामुळे रत्नागिरीच्या शैक्षणिक विकासालाही चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसृष्टीचे उद्धघाटन

मंत्रिमंडळ विस्तारानंतर 14 ऑगस्टपासून उदय सामंत जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. आमदार योगेश कदम यांच्या मतदारसंघाचा यावेळी प्राधान्याने आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर चिपळूण येथे वाशिष्ठीची पाहणी करून अधिकार्‍यांबरोबर चर्चा केली जाणार आहे. संगमेश्वर येथून थेट रत्नागिरीत येऊन मारुती मंदिर येथील शिवसृष्टीचेही उद्धघाटन केले जाणार आहे.याचवेळी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणात उभारण्यात आलेल्या स्मृतिशिल्पाचा शुभारंभही याच दिवशी केला जाणार आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.