AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमानाशी संबंधित VSR कंपनी अचानक का बंद झाली? रोहित पवारांचा सवाल

अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांनी गंभीर आरोप केले असून, विमानाचे रजिस्ट्रेशन बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणातील तांत्रिक बाबी आणि व्हीएसआर कंपनीच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

विमानाशी संबंधित VSR कंपनी अचानक का बंद झाली? रोहित पवारांचा सवाल
| Updated on: Feb 18, 2026 | 1:15 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील दुर्दैवी विमान अपघातानंतर संपूर्ण राज्य अद्यापही धक्क्यातून सावरलेले नाही. या भीषण अपघाताबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अत्यंत गंभीर आणि तांत्रिक मुद्दे उपस्थित करत खळबळजनक दावा केला आहे. या सदर विमानाचे रजिस्ट्रेशन बेकायदेशीर होते आणि ते मुद्दाम व्हीआयपी लोकांसाठी वापरले गेले का, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

रोहित पवार यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या विमानांच्या देखभालीबाबत रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिले. यावेळी त्यांनी विमानाचे रंगकाम घरी किंवा साध्या गॅरेजमध्ये करता येत नाही, त्यासाठी संबंधित कंपनीकडेच जावे लागते ज्यासाठी ३ ते ४ कोटींचा खर्च येतो. मात्र, या प्रकरणात विमानाचे रंगकाम संशयास्पद रतीने करण्यात आल्याचे दिसते. अपघातानंतर विमानाची शेपटी जळाल्यावर त्यावर एक लपलेला नंबर स्पष्ट झाला, असे रोहित पवार म्हणाले.

रोहित पवारांच्या दाव्यानुसार, त्यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे काही धक्कादायक बाबी समोर आणल्या आहेत. या विमानाच्या शेपटीवर N8QPQ हा नंबर दिसून आला, जो युएस (US) रजिस्ट्रेशनचा आहे. अमेरिकेतील संपर्काचा वापर करून माहिती काढली असता, या विमानाचे ५ वेगवेगळे मालक असून त्यात काही फायनान्स कंपन्यांचाही समावेश आहे. भारतात लेअरजेट (Learjet) विमानांचे रजिस्ट्रेशन काही तांत्रिक कारणांमुळे होऊ शकत नाही. मात्र, या प्रकरणात डीजीसीए (DGCA) अधिकार्‍यांचा वापर करून हे विमान बेकायदेशीररीत्या रजिस्टर केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे.

हे स्वस्तातील विमान मुद्दाम व्हीआयपींच्या प्रवासासाठी वापरले गेले का?

हे स्वस्तातील विमान मुद्दाम व्हीआयपींच्या प्रवासासाठी वापरले गेले का? तसेच या प्रकरणाशी संबंधित असलेली व्हीएसआर (VSR) कंपनी अचानक का बंद झाली?” असे प्रश्न विचारत रोहित पवारांनी या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.  नियमानुसार सीव्हीआरमध्ये 2 तासांचा आवाज रेकॉर्ड होणे आवश्यक आहे. या विमानात फक्त 30 मिनिट रेकॉर्ड होऊ शकत होते. तसेच, भारतात 90 कोटींची हाय-टेक लॅब असताना ब्लॅक बॉक्स तपासासाठी कॅनडाला का पाठवला, असा सवाल त्यांनी केला. अपघात झाल्यानंतर चौकशीची ऑर्डर काढायला 4 दिवस का लागले, असा प्रश्न त्यांनी विचारला. तसेच, डीजीसीएच्या वेबसाईटवरून अकाउंटेबल मॅनेजरचे नाव का हटवले, असा संशय रोहित पवारांनी व्यक्त केला. या दाव्यांमुळे आता विमान सुरक्षा आणि प्रशासकीय कामकाजावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...