AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! तुमचे पण व्हिडीओ व्हायरल करेन; चाकणकरांनी नेत्यांना धमकी दिल्याचा रुपाली ठोंबरे यांचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर अत्यंत गंभीर आणि थेट आरोप केले आहेत.

मोठी बातमी! तुमचे पण व्हिडीओ व्हायरल करेन; चाकणकरांनी नेत्यांना धमकी दिल्याचा रुपाली ठोंबरे यांचा दावा
रुपाली ठोंबरेImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 15, 2026 | 12:45 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून राज्यात लिंगपिसाट अशोक खरात हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणी दिवसेंदिवस नवनवीन खुलासे होताना दिसत आहे. अशोक खरातची सध्या SIT चौकशी सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर अत्यंत गंभीर आणि थेट आरोप केले आहेत. नाशिक येथील भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात यांच्या लैंगिक शोषण आणि सेक्स रॅकेट प्रकरणात चाकणकरांच्या माध्यमातून महिलांवर थेट लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.

रुपाली ठोंबरेंचे आरोप काय?

रुपाली ठोंबरे यांनी चाकणकरांवर आरोप करत म्हटले की, दहावी नापास कोंबडी चोराच्या भोंदू बाबाच्या ट्रस्ट वरती तुम्ही आहात. तुमच्या माध्यमातून महिलांवरती लैंगिक अत्याचार झाले. तुम्हाला अटक झाली पाहिजे, का अटक होत नाही…? ज्यांना चाकणकर यांनी पूजेला नेलं ते चाकणकरला वाचवत आहेत. तुमचे पण व्हिडीओ व्हायरल करेन अशा धमक्या चाकणकर यांनी ज्यांनी ज्यांनी करंगळ्या कापल्या त्यांना दिल्या आहेत. त्यामुळे ते चाकणकरला वाचवत आहेत.

“पोलीस चाकणकर आणि चाकणकरच्या परिवाराला वाचवत आहेत”

पुढे रुपाली ठोंबरे म्हणाल्या, रूपाली चाकणकरला कायदा कळत नाही संविधान कळत नाही. वागण्याच्या रीती रिवाज कळत नाही. ज्यांना महिला आयोगाच्या पदाची गरिमा कळली नाही त्यांनी 28 दिवसांनी बोलू द्या किंवा 280 दिवसांनी बोलू द्या त्यांच्याकडे बोलायला काही नाही. रूपाली चाकणकरने पुरावे देऊन बोलावं. पोलीस चाकणकर आणि चाकणकरच्या परिवाराला वाचवत आहेत. शेवटी रुपाली ठोंबरे यांनी रूपाली चाकणकरच्या टोळी मधल्या ज्या ज्या महिला आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

नाशिकमध्ये अशोक खरातवर महिलांचे लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग आणि अश्लील व्हिडीओ बनवल्याचे आरोप आहेत. या प्रकरणात खरात यांना अटक झाली असून, एसआयटी मार्फत चौकशी सुरू आहे. या प्रकरणात रूपाली चाकणकर यांचे खरातशी निकटचे संबंध असल्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते, ज्यामुळे चाकणकर यांना महिला आयोग आणि पक्षातील पद सोडावे लागले होते. ठोंबरे पाटील यांनी या प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून, रूपाली चाकणकर यांना तातडीने अटक करण्याची आणि त्यांना सहआरोपी म्हणून तपासात समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. रूपाली ठोंबरे पाटील यांच्या या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रूपाली ठोंबरे आणि रुपाली चाकणकर एकाच पक्षातील असल्याने हा वाद आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत संघर्षाचे रूप घेत असल्याचे दिसते.

Follow Us
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन.
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का.
राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल
राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल.
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी.
भाजपचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे त्या प्रकरणात दिसतंय
भाजपचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे त्या प्रकरणात दिसतंय.
संसदेत शाब्दिक चकमक; संजय राऊतांचे भाजपवर तीव्र शब्दांत टीकास्त्र
संसदेत शाब्दिक चकमक; संजय राऊतांचे भाजपवर तीव्र शब्दांत टीकास्त्र.
नाशिक धर्मांतर प्रकरणातील 7 जण अटकेत,मुख्य सूत्रधार निदा खान कुठे फरार
नाशिक धर्मांतर प्रकरणातील 7 जण अटकेत,मुख्य सूत्रधार निदा खान कुठे फरार.
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल.
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला.
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?.