आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध; ठाकरे गट-भाजप आमनेसामने, रामा हॉटेलबाहेर तुफान राडा
BJP Shivsena Thackeray Group Rada : भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. छत्रपती संभाजीनगरममधील रामा हॉटेलबाहेर भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्ते आमने आले. यावेळी जोरदार आदित्य ठाकरेंविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. वाचा सविस्तर...
शिवसेना ठाकरे गटाचे नेते, वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी भाजपकडून त्यांच्या दौऱ्याला विरोध केला जात आहे. शिवसेना ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्चे आमने-सामने आले आहेत. छत्रपती संभाजीनगरममधील रामा हॉटेलबाहेर भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्ते आमने आले. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपचं आंदोलन
आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला भारतीय जनता पार्टीने विरोध केला आहे. रामा हॉटेलच्या बाहेर आदित्य ठाकरे ला काळे झेंडे दाखवून विरोध करण्यात येत आहे. आदित्य ठाकरेंच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. तसंच दिशा सालीयनचे फोटो असणारे पोस्टर घेऊन यावेळी आदित्य ठाकरेंचा निषेध करण्यात येत आहे. तर आदित्य ठाकरे यांना विरोध करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना शिवसेना ठाकरे गटाकडूनही विरोध करण्यात आला. यावेळी भाजप आणि शिवसेना ठाकरे गट आमने-सामने आले होते.
रामा हॉटेलबाहेर भाजपची जोरदार घोषणाबाजी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आदित्य ठाकरे आहेत. आज ते पैठण वैजापूर तालुक्यात सभा शेतकरी संवाद मेळावे घेणार आहेत. आदित्य ठाकरे यांचा दौरा सुरू होण्याआधीच जोरदार राडा झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील रामा हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे थांबले आहेत. या हॉटेलबाहेर भाजपने जोरदार घोषणाबाजी केली आहे. दिशा सलीयन प्रकरणात ‘जबाब दो’ म्हणत भाजपकडून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निषेध करण्यात येत आहे. आदित्य ठाकरे थांबले होते त्या रामा हॉटेलच्या बाहेर भाजप कार्यकर्ते जमले. त्यांनी घोषणाबाजी कर आदित्य ठाकरेंविरोधात आंदोलन केलं आहे.
भाजपने आदित्य ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर ठाकरे गटाकडूनही त्यांना उत्तर देण्यात येत आहे. भाजपला विरोध करण्यासाठी ठाकरे गटाचे कार्यकार्ये मोठ्या प्रमाणात त्याच हॉटेल बाहेर आंदोलन करत आहेत. यावेळी ठाकरे आणि भाजप आमने सामने आले आणि तुफान राडा झाला आहे. यावेळी भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झील्याचं पाहायला मिळालं.