Chhatrapati Sambhajinagar Election Results 2026 LIVE: शहरालगतच्या भागात कोण धुरंधर? कुणाच्या पदरात जनतेचा कौल?
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates in Marathi : छत्रपती संभाजीनगरचा चारही दिशांनी झपाट्याने वाढ होत गेली. काही गावं महापालिका हद्दीत दाखल झाली आहेत. शहर आणि या गावातील अंतर आता उरले नाही. या प्रभागात सर्वच जाती-धर्माचे लोक नांदतात. ते कुणाच्या पारड्यात मत टाकणार, याचा फैसला आज होणार.

Chhatrapati Sambhajinagar Election Results 2026 LIVE: छत्रपती संभाजीनगर शहराभोवती आता दाट लोकवस्ती वाढली आहे. पूर्वी शहरालगतची गावं आणि शहरामध्ये दूरदूरपर्यंत घरं नव्हती. पण नवीन वसाहतींनी हे अंतर संपवले आहे. या नवीन वसाहतींच्या अनेक समस्या आहेत. रस्ते, ड्रेनेज, नाल्यांपासून कचरा या समस्यांचा विळखा आहे. पॉश सोसायटी असल्या तरी पावसाळ्यात इथं चालणं जिकरीचं होतं. त्यामुळे या भागात सर्वच पक्षांनी आश्वासनांचा महापूर आणला. प्रचारादरम्यान आश्वासनांची पोतडी सोडली. काल झालेल्या मतदानात, मतदारांनी कुणावर विश्वास टाकला हे आता समोर येईल.
मराठवाड्यातील सर्वात मोठी महापालिका
Municipal Election 2026
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
यंदा 115 नगरसेवक निवडण्यासाठी 29 प्रभाग तयार करण्यात आले होते. यातील एक शेवटचा प्रभाग 3 सदस्यांचा आहे. गेल्यावेळेचे आरक्षणच लागू असल्याने यावेळी 55 जागा आरक्षित होत्या. 2015 मध्ये 113 वॉर्डासाठी निवडणूक घेण्यात आली होती. त्यानंतर सातारा-देवळाईचा भाग मनपात समाविष्ट करण्यात आला. या भागातून दोन सदस्य निवडून आले होते. त्यामुळे मनपा सदस्यांची संख्या यावेळी 115 इतकी आहे.
प्रभाग क्रमांक 02
प्रभाग क्रमांक 02 हा शहरालगतचा जुना आणि नवीन भाग आहे. येथे आता अनेक वसाहती नव्याने वसल्या आहेत. अनेक कुटुंब स्थायिक झाली आहेत. या प्रभागाची एकूण लोकसंख्या 37,992 इतकी आहे. यामध्ये अनुसूचीत जातीची संख्या 5967 तर अनुसूचीत जमातीची लोकसंख्या 613 इतकी आहे. या प्रभागात भारतनगर,वानखेडेनगर,होनाजीनगर, पटेल प्लॅनेट, आयआयएचएम ही मोठी संस्थआक, यादनवनगर, नवजीवन कॉलनी, नवनाथनगर, एमएसईबी पॉवर हाऊस, मयुरनगर, दीपनगर, सुदर्शनगर, गजानन नगर, डी मार्ट, रोझाबाग या वसाहतींचा समावेश होतो.
प्रभाग क्रमांक 03
प्रभाग क्रमांक 03 मध्ये अनेक जुन्या वसाहतींपासून ते नव्याने तयार होणार्या अनेक वसाहतींचा समावेश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जवळपासचा परिसर यामध्ये येतो. पहाडसिंगपूरा, बेगमपूरा, विद्युत कॉलनी, हनुमान टेकडी, साफल्य नगर, पेठे नगर, भावसिंगपूरा, भीमनगर, कानिफनाथ कॉलनी, जयसिंगपूरा, कुतूबपुरा, पराक्रम कॉलनी या प्रभागात येते.या प्रभागाची लोकसंख्या 46,003 इतकी आहे. तर यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 13,467, अनुसूचित जमातीची लोकसंख्या 818 इतकी आहे.
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार | पक्ष |
|---|---|---|
| 02 | ||
| 03 | ||
| 04 | ||
प्रभाग क्रमांक 04
या प्रभागात मोठा परिसर येतो. नाशिक-येवल्याकडं जाणाऱ्या रस्त्यावरील वसाहतींसह जुन्या वसाहतींचा यामध्ये समावेश होतो.लक्ष्मी कॉलनी, पडेगाव, मिटमिटा, पोलीस कॉलनी, विकासपूरी, एमएसईबी पॉवर हाऊस, रामगोपाल नगर, कासलीवाल तारांगण,शिवपूरी, भीमनगर, भावसिंगपूरा,नंदनवन कॉलनी, शांतीपूरा, संगिता कॉलनी, अमित नगर, पेठेनगर, साकेत नगर, मिलिंद कॉलेज परिसराचा यामध्ये समावेश होतो. या प्रभागाची लोकसंख्या 45,140 इतकी आहे. तर यामध्ये अनुसूचीत जातीची संख्या 14,390, अनुसूचीत जमातीची संख्या 1055 इतकी आहे.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE
