AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापालिकेची इमारत ‘भुतिया’, तिथे आत्मे वावरतात; महायुतीतील मंत्र्यांच्या विधानाने मोठी खळबळ, संजय शिरसाट यांचा दावा तरी काय?

Sanajay Shirsat on Municipal Corporation Buliding Hunted: छत्रपती संभाजीनगर महापालिका ही कब्रस्थान परिसरात आहे. त्यामुळे इथं आत्म्यांचा वावर आहे, असे विधान मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. त्याने एकच खळबळ उडाली आहे. काय म्हणाले शिरसाट?

महापालिकेची इमारत 'भुतिया', तिथे आत्मे वावरतात; महायुतीतील मंत्र्यांच्या विधानाने मोठी खळबळ, संजय शिरसाट यांचा दावा तरी काय?
संजय शिरसाट, छत्रपती संभाजीनगर महापालिकाImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 16, 2026 | 11:55 AM
Share

Sanajay Shirsat on Municipal Corporation Buliding Hunted: कब्रस्तानच्या जागेवर छत्रपती संभाजीनगर महापालिकेची इमारत उभी आहे. त्यामुळे इथे आत्म्यांचा वावर आहे. या आत्म्यातून मुक्ती हवी असेल तर इमारत इतर जागी बांधावी लागेल असं धक्कादायक वक्तव्य मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. इथले आत्मे कधी कधी तुम्हाला डिवचतात. त्यामुळे तुम्ही बैचेन होतात, असा माझा समज आहे. त्यामुळे यामधून मुक्ती हवी असेल तर ही इमारत चांगल्या ठिकाणी करा, असा सल्ला मंत्री संजय शिरसाट यांनी दिला. त्यावर आता एमआयएमने चिमटा काढला आहे.

शहरातील रस्ते मोठे होणार

36 मीटर उंचीचे मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर टेंडर सेटचा लोकार्पण सोहळा आहे. बाराव्या मजल्यावर आग लागली तरी विजवण्यासाठी मदत होणार आहे. आज मला मनापासून आनंद होतोय ज्या महानगरपालिकेत मी दहा वर्षे काम केलं त्यामुळे महानगरपालिकेच्या वैभवात भर पाडण्याचं काम मला करता आलं. स्वप्नांला पैशाची जोड असावी म्हणून मी हा प्रयत्न केला आहे. शहरातला अतिक्रमण काढलं आहे. आता रस्ते मोठे कधी होणार हे सगळे स्वप्न आता लोक पाहत आहेत. 32 कोटी रुपये मी पोल शिफ्टिंग साठी दिले आहेत, जो 32 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यातले वापरायला 23 कोटी आले आहेत बाकीचे टॅक्स मध्ये गेलं आहे. अनेक जण अनेक प्रपोजल घेऊन येतात त्यात वैयक्तिक स्वार्थ असतो हे नाकारता येत नाही. माझ्याकडे असं एक अग्निशमन गाडीच प्रपोजल आलं.कुणाला आग लावण्याची सवय असते तर कोणाला आग विझवण्याची सवय असते, आम्ही आता आग विझवणाऱ्या पैकी एक आहोत महानगरपालिका आता ठोसपणे सांगू शकेल, असे शिरसाट म्हणाले.

महानगरपालिकेत मी चांगल्या कामासाठी येत जाईल, नारळ तुम्ही फोडत जा फक्त मला थँक्स म्हणत जा. आता नक्षत्रवाडी पर्यंत पाणी आले आहे. काही लोक त्यावरही टीका करतील. नक्षत्रवाडीला पाणी आलं, लोकांना असं वाटेल एक दोन दिवसात येईल असं वाटेल, पण थोडं थांबा. आयुक्त जी. श्रीकांत याला थांबवण्यासाठी प्रयत्न करत होतो तसं काम तुमच्याकडून झालं पाहिजे. तर एमआयएमचे विरोधी पक्षनेते समीर वाजेद यांनाही मंत्री महोदयांनी यावेळी चिमटा काढला.

हा सगळा कब्रस्थानचा भाग

ही महानगरपालिकेची इमारत स्थलांतरित झाला तर बरं होईल. महानगरपालिकेला ग्रहण लागायचं कारण म्हणजे इथे सगळे मुडदे गाडत होते, हा सगळा कब्रस्तानचा भाग आहे. नवीन इमारत झाली पाहिजे आत्म्यांना सुद्धा शांती मिळेल. या गाडीसाठी आपण सोळा कोटी रुपये दिले आहेत, कोणत्याच महानगरपालिकेत आशा गाड्या पाहायला मिळणार नाही. जोपर्यंत मी पालकमंत्री आहे तोपर्यंत मी निधी देण्याचा प्रयत्न करेल. आपणा दिल बडा आहे पाठीमागे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत, वशिला लावून आपण निधी आणू, असे आश्वासन मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.

Follow Us
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!
मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट
Rain Alert | मुंबईकरांनो सावधान! पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासन अलर्ट मोडवर
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल;
ठाकरेंच्या सेनेत मोठ्या घडमोडी! 130 ज्येष्ठ शिवसैनीकांचं मोठं पाऊल; पक्षातील...
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्य
'मविआ'ला आणखी मोठा धक्का! निकटवर्तीय आमदाराने पुन्हा उडवली झोप.. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप?