AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrashekhar Bawankule | ‘बावनकुळे नॉलेज नसताना बडबड करतात’, ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल

Chandrashekhar Bawankule | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची, निवडणुकीपर्यंत पत्रकारांना कसं संभाळायच? त्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. आता ठाकरे गटाच्या एका मोठ्या नेत्याने या क्लिपमधील वक्तव्याचा समाचार घेतलाय.

Chandrashekhar Bawankule | 'बावनकुळे नॉलेज नसताना बडबड करतात', ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
Image Credit source: चंद्रशेखर बावनकुळे फेसबुक
| Updated on: Sep 26, 2023 | 12:37 PM
Share

संभाजीनगर (दत्ता कनवटे) : सध्या राजकीय वर्तुळात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कथित ऑडिओ क्लिपची चर्चा आहे. या क्लिपमध्ये चंद्रशेखर बावनकुळे हे 2024 निवडणुकीपर्यंत पत्रकारांनी आपल्याविरोधात बातमी छापू नये, यासाठी काय करायच ते कार्यकर्त्यांना सांगतायत. पत्रकारांना चहा प्यायला घेऊन जा. त्यांना चहा प्यायला बोलवायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे तुम्हाला समजलंच असेल. त्यांना ढाब्यावर जेवायला घेऊन जा. आपल्याविरोधात एकही बातमी छापली जाता कामा नये, असं या ऑडिओ क्लिपमध्ये ते म्हणताना ऐकू येतय. अहमदनगरमधील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतील ही क्लिप असल्याच बोलल जातय. चंद्रशेखर बावनकुळे यांची ही कथिक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका सुरु आहे.

आता ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. “चंद्रशेखर बावनकुळे हे वाचळवीर आहेत. चहा कुणाला पाजायचा हे कार्यकर्त्यांना माहिती असतं, पत्रकारांना कसं सांभाळायचं हे माहिती असतं, बावनकुळे हे कधीही काहीही बोलतात, नॉलेज नसताना बडबड करतात” अशी टीका खैरे यांनी केली. “हे फुटलेले गद्दार लोक काहीही करतात, कुणी तोंडात मारते, कुणी दारू प्या म्हणते, कुणीही काहीही बोलतात, त्यामुळे त्यांची प्रतिमा सुधारणार नाही, मला देवेंद्रजींना प्रश्न विचारतो की देवेंद्रजी हे लोक कसे आवडतात प्रतिमा निर्माण करणे हे हास्यास्पद आहे” असं खैरे म्हणाले. ठाणे हवे असेल तर हे वाद होणारच

“नामांतरविरोधात काहीही याचिका टाकली तरी काहीही होणार नाही, भाजपची बी टीम वाद निर्माण होण्यासाठी या याचिका टाकत असतात, पण त्याचा काहीही उपयोग नाही. भाजपला ठाणे हवे असेल तर हे वाद होणारच, कमळावर उभं राहा यासाठी सुद्धा भाजप प्रयत्न करतय. भाजप खरोखर फुटण्याची शक्यता आहे” असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.