AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊतांची निर्दोष मुक्तता, न्यायालयाचा निर्णय, नेमकं प्रकरण काय?

संजय राऊत यांची मेधा सोमय्या मानहानी प्रकरणात सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. माझगाव कोर्टाची १५ दिवसांची शिक्षा रद्द झाली असून राऊतांना मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे.

संजय राऊतांची निर्दोष मुक्तता, न्यायालयाचा निर्णय, नेमकं प्रकरण काय?
sanjay raut
| Updated on: Feb 26, 2026 | 12:16 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. संजय राऊत यांना मानहानीच्या एका जुन्या प्रकरणात आज मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी डॉ. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या दाव्यात सत्र न्यायालयाने संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता केली आहे. यापूर्वी माझगाव न्यायालयाने संजय राऊत यांना १५ दिवसांची कैद आणि दंडाची शिक्षा सुनावली होती. पण आता ती शिक्षा पूर्णपणे रद्द झाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

हे संपूर्ण प्रकरण मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील शौचालय बांधकामाशी संबंधित आहे. सोमय्या दाम्पत्याने या कामात १०० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या आरोपांमुळे आपली आणि आपल्या संस्थेची सामाजिक प्रतिष्ठा मलीन झाली आहे, असा दावा डॉ. मेधा सोमय्या यांनी केला होता. यानंतर त्यांनी कलम ५०० अंतर्गत संजय राऊतांविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता.

माझगाव न्यायालयाचा निकाल काय?

या प्रकरणात सुरुवातीला माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने संजय राऊत यांना दोषी धरले होते. त्यांना १५ दिवसांची कैद आणि २५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र संजय राऊत यांनी या शिक्षेला सत्र न्यायालयात आव्हान दिले. मी केवळ तक्रारींच्या आधारे प्रश्न उपस्थित केले होते, अनेकांनी या घोटाळ्याबाबत तक्रारी केल्या असताना केवळ माझ्यावरच कारवाई का? असा युक्तिवाद राऊत यांच्या वकिलांनी त्यावेळी केला होता.

सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

गेल्या अनेक दिवसांपासून सत्र न्यायालयात यावर अंतिम युक्तिवाद सुरू होता. आज निकालाच्या वेळी संजय राऊत, किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या हे तिघेही न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित होते. सत्र न्यायलयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर माझगाव कोर्टाचा निकाल बाजूला सारत संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता केली.

यावेळी न्यायालयाबाहेर पडताना एक विशेष दृश्य पाहायला मिळाले. निर्दोष मुक्तता झाल्यानंतर संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांना हात जोडून नमस्कार केला आणि ते तिथून निघून गेले. या निकालानंतर किरीट सोमय्या यांनी मी न्यायालयाच्या या निकालाचा सविस्तर अभ्यास करेन. निकालपत्रातील तांत्रिक बाबी तपासून पाहिल्यानंतरच मी यावर भाष्य करेन,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसरीकडे संजय राऊत लवकरच या निकालावर सविस्तर पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.

रोहित पवारांना मुख्यमंत्री कार्यालयाचा फोन! नेमकं कारण काय?
रोहित पवारांना मुख्यमंत्री कार्यालयाचा फोन! नेमकं कारण काय?.
भिगवण अपहरण प्रकरण: तरुणीने कोर्टात जबाब बदलला! आईकडे जाण्याचा निर्णय
भिगवण अपहरण प्रकरण: तरुणीने कोर्टात जबाब बदलला! आईकडे जाण्याचा निर्णय.
सुनेत्रा पवारांची आज राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणार
सुनेत्रा पवारांची आज राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणार.
धक्कादायक... फळांना लावलं चक्क उंदिर मारण्याचं औषध
धक्कादायक... फळांना लावलं चक्क उंदिर मारण्याचं औषध.
एवढी हिंमत? चक्क कॉलेजचं नावच गुजरातीत लिहिलं, ठाकरे सेना आक्रमक
एवढी हिंमत? चक्क कॉलेजचं नावच गुजरातीत लिहिलं, ठाकरे सेना आक्रमक.
मालेगाव महापालिकेत नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल
मालेगाव महापालिकेत नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल.
...तर महाराष्ट्र माफ करणार नाही! संजय राऊतांनी दिला इशारा
...तर महाराष्ट्र माफ करणार नाही! संजय राऊतांनी दिला इशारा.
रोहित पवार आणि पोलीस निरीक्षकांमध्ये चर्चा सुरू; गुन्हा दाखल होणार का?
रोहित पवार आणि पोलीस निरीक्षकांमध्ये चर्चा सुरू; गुन्हा दाखल होणार का?.
अजित पवार अपघात प्रकरणी सरकार गंभीर नाही; राऊतांचा गंभीर आरोप
अजित पवार अपघात प्रकरणी सरकार गंभीर नाही; राऊतांचा गंभीर आरोप.
रोहित पवार आणि युगेंद्र पवार बरामती पोलीस ठाण्यात पोहोचले
रोहित पवार आणि युगेंद्र पवार बरामती पोलीस ठाण्यात पोहोचले.