भारत-पाकिस्तान सामन्यानंतर संजय राऊतांचे गंभीर आरोप, थेट म्हणाले, सामना फिक्सिंग..
काल झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यावरून संजय राऊत यांनी अत्यंत मोठा आणि गंभीर आरोप केलाय. संजय राऊत यांनी भाजपावर गंभीर आरोप केली आहेत. हेच नाही तर त्यांनी या सामनया फिक्सिंग असल्याचे म्हटले आहे.

काल भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना झाला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारून पराभव केला. मात्र, भारतीय क्रिकेट संघाने हा सामना खेळू नये, अशी मागणी केली जात होती. हेच नाही तर हा सामना रद्द करण्यात यावा असे सांगितले जात होते. भारतीय क्रिकेट संघाची देखील हा सामना न खेळण्याची भूमिका नव्हती, मात्र त्यांच्यावर सरकारचा दबाव होता, असा आरोप राऊतांनी केला. संजय राऊत यांनी या सामन्यावरून सरकारला खडेबोल सुनावले आहेत. यासोबतच त्यांनी काही गंभीर आरोप केली आहेत. संजय राऊत म्हणाले की, 25 हजार कोटी काल पाकिस्तानमध्ये या सामन्यानंतर गेली आहेत. पाकिस्तान हा पैसा भारताच्याविरोधात वापरणार. पैशांसाठी तुम्ही एका सामन्यावर बंदी घालू शकत नाहीत?
पुढे संजय राऊत यांनी म्हटले की, भारत पाकिस्तान सामना हा फिक्सिंग होता. ज्या पाकिस्तानला कर्ज मिळू नये, याकरिता आपण प्रयत्न केली, त्याला सामन्यातून पैसा कमावून दिले. संधी असताना भाजपाने माघार घेतली. कालच्या सामन्यात दीड लाख कोटींचा जुगार खेळला गेला. भारताने सामना खेळून नाचक्की करून घेतलीये. संघाची इच्छा नसताना हा सामना खेळवला गेल्याचे सुनील गावस्कर यांनी काल म्हटले.
यावेळी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत संजय राऊत यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे यांनी सर्वात अगोदर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावणे बंद करावे. शेक हॅंड केले नसल्याचे सांगितले जात आहे…पण तुम्ही सामना तर खेळला ना? भारत पाकिस्तान सामन्यावर संजय राऊत यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका करत म्हटले की, हा सामना संघातील खेळाडूंना खेळायचा नव्हता. मात्र, सरकारच्या दबावामुळे खेळावा लागला.
काल राज्यभरात भारत आणि पाकिस्तान सामन्याला विरोध करण्यात आला. उबाठा गटाने आंदोलने देखील केली. पहलगाम हल्ल्याला काही महिने पूर्ण झाली नाहीत, तोवरच अशाप्रकारचा क्रिकेट सामना खेळणे चुकीचे असल्याचे अनेकांनी म्हटले. पहलगाम हल्लयात अनेक भारतीय लोकांचे जीव गेले अजूनही भारताकडून ऑपरेशन सिंदूर हे राबवले जात आहे.
