Sanjay Raut : शरद पवार भाजपसोबत जाण्याच्या प्रश्नावर संजय राऊत यांनी अत्यंत ठामपणे, विश्वासाने उत्तर दिलं की..
Sanjay Raut : "मोदींच्या मनात काय येईल सांगता येत नाही. त्यांनी इटलीमध्ये जाऊन प्लास्टिक नोटा जाऊन पाहिल्या असतील. बाहेर गेलं की असं वाटतं त्यांना. तुम्ही इटलीचं नाव का घेतलं, त्यावर इटलीचं त्यांना फार आकर्षण आहे, ट्रम्पचं आकर्षण आहे. ते तिथे नवीन गोष्टी पाहतात, जी बाद होणारी असते आणि इथे घेऊन येतात" असं राऊत म्हणाले.

मोदी सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेतला? या बाबत संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. सरकारमध्ये सहभागी असलेल्या कुठल्या पक्षाचा दबाव होता, त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. “चंद्राबाबू नायडू यांच्याकडून सरकारला संदेश गेला. आमच्या राज्यात आमच्यावर दबाव आहे. आम्ही सरकारमध्ये आहोत, पाठिंबा देत आहोत. त्याची किंमत आम्ही मोजणार नाही. त्यातून कठोर संदेश गेला. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात आला” असा दावा संजय राऊत यांनी केला. जंतर-मंतर येथे मुलांवर झालेल्या लाठीचार्जवर सुद्धा ते बोलले. “शेकडो मुलींचा विनयभंग झाला, हा आदेश कोणी दिला? या देशाच्या गृहमंत्र्यांनी संसदेत येऊन निवदेन करावं. बाकी सगळ्या गोष्टींवर निवेदन करतात. पक्ष फोडण्याच्या जबाबदाऱ्या घेतात. जंतर-मंतरवरील लाठीचार्जची जबाबदारी कोणी घ्यावी, या बाबत गृहमंत्र्यांनी निवेदन करावं. पीएम मोदींनी माफी मागावी” अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
“पेपरफुटला हे राज्याचे मुख्यमंत्री मान्य करणार नाहीत. पेपरफुटीचे लाभार्थी हे त्यांच्याच पक्षाचे आहेत. नीटचा पेपर फोडणारे भाजपचेच लोक आहेत. मुख्यमंत्र्यांनी मान्य करावं पेपर फुटला. महाराष्ट्राचा नंबर सगळ्यात खाली त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत” असं संजय राऊत म्हणाले. मोदींनी पोस्ट केलेल्या व्हिडिओवर राऊत यांनी उत्तर दिलं. “जंतर-मंतरची आमची मुलं आहेत, त्यांनी मोदींच्या व्हिडिओवर, भाषणावर हास्य-जत्रा सुरु केली. आमचे मुख्यमंत्री बोलतात कोट्यवधी लोकांनी पाहिला. इतक्या मिलियन लोकांनी शिव्या घातल्या ते पण पहा. जंतर-मंतरवरच्या डिजिटल मास्टर मुलांकडून शिकलं पाहिजे. या देशाने खरी डिजिटल इंडिया तिथे पाहिली. भाजपच्या आयटी सेलला टाळं लावावं लागलं” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
त्यात नरेंद्र मोदी बसत नाहीत
शरद पवार एनडीएमध्ये जाणार अशा चर्चा आहेत. त्यावर पत्रकारांनी विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, “शरद पवार आणि सुप्रिया सुळे ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करतात ओरिजनल. मी खात्रीने सांगतो ते जातीयवादी, राष्ट्रविघातक पक्षांसोबत कधी जाणार नाहीत, म्हणजे भाजपंसोबत. मी पवारसाहेबांची जी विचारधारा पाहतो त्यात नरेंद्र मोदी बसत नाहीत”
भ्रष्टाचाराचं अवडंबर माजवण्याचं काम भाजपं करतो
काल संसदेत धर्मेंद्र प्रधान यांचं भाजपकडून स्वागत करण्यात आलं. त्यावर राऊत म्हणाले की, “प्रत्येक अपवित्र गोष्टींना मंगलमय करण्याची भाजपला सवय आहे. धर्मेंद्र प्रधान हुतात्मा आहेत का?” असा उलटा सवाल त्यांनी केला. “मुलांनी त्यांचा राजीनामा घेतला. नीट परीक्षेत घोटाळा झाला म्हणून. भ्रष्टाचाराचं अवडंबर माजवण्याचं काम भाजपं करतो. आपल्या पक्षातले गुन्हेगार, बलात्कारी यांना पालखीत बसवून संतांसारखी मिरवणूक काढतात. त्यात आता धर्मेंद्र प्रधानची भर पडली आहे” असं संजय राऊत म्हणाले.
