AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील कच्च मडकं; संजय राऊत यांची खोचक टीका

नाशिक महापालिकेत 800 ते 900 कोटींची लूट झाली. हे छोटी गोष्ट नाही. बिल्डरांना पैसे मिळाले, बिल्डर कसे शेतकरी झाले? हा मोठा भूसंपादन घोटाळा आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला. तसेच नंदूरबार यावेळी महाविकास आघाडी जिंकेल. नंदूरबार हा परंपरेने काँग्रेसचा गड आहे. इंदिरा गांधी वर्षानुवर्ष प्रचाराची सुरुवात नंदूरबारमधून करत आहे. नंदूरबार, रावेर, जळगाव, नाशिक असे सर्व उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघ महाविकास आघाडी जिंकणार आहे, असंही ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील कच्च मडकं; संजय राऊत यांची खोचक टीका
devendra fadnavis Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 12, 2024 | 10:55 AM
Share

आम्हाला मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांना अशी स्वप्न पडतात. त्यांना सत्तेचा आजार झाला होता. फडणवीस यांना गांभीर्याने घेऊ नका. फडणवीस हे राजकारणातील कच्च मडकं आहेत. अत्यंत कच्च मडकं आहे. कॉपी करून पास होणाऱ्या लोकांसारखे ते आहेत. तसं हे मडकं आहे, असा जोरदार हल्ला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर चढवला आहे. आम्ही नारायण राणे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली होती आणि आम्ही हरलो. हे फडणवीस यांना माहीत नसेल. ते तेव्हा राजकारणात फार नव्हते, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे स्वत:चं असं काही नाही. लोकं त्यांना मतं देणार नाहीत. महाविकास आघाडी किमान 35 जागा जिंकत आहे. अजित पवार गट एकही जागा जिंकणार नाही. शिंदे गटालाही एकही जागा मिळणार नाही. आमचे कार्यकर्ते तनमनधनाने काम करत आहेत. अजित पवार यांच्या उमेदवारांच्या निवडणुका संपल्या आहेत. ते मोकळे झाले आहेत. मुख्यमंत्र्यांची धावपळ सुरू आहे. त्यांची अखेरची तडफड सुरू आहे. त्यांचं बॅलन्स शिल्लक नाही. डिपॉझिट जाईल, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

मोदी पायउतार होतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदी राहणार नसल्याचं संजय राऊत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. मोदींना सप्टेंबरमध्ये 75 वर्ष होत आहेत. 75 वर्षावरील नेत्यांनी संसदीय राजकारणात राहायचं नाही, असा नियम मोदींनीच केला आहे. त्यांनीच नियम केल्याने त्यांना दूर जावं लागणार आहे. पण त्या आधीच 4 जून रोजी मोदींना सत्तेतून पायउतार व्हावे लागेल, असं संजय राऊत म्हणाले.

कानाखाली थाप पडेल

उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना मुलाखत दिली होती. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आहे. हा काळूबाळूचा तमाशा आहे, असं बावनकुळे म्हणाले. त्यावरही राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही तमाशाचा अपमान करत आहात. काळूबाळूचा तमाशा ही सांस्कृतिक ताकद होती. काळूबाळू यांनी लोकांना जागृत केलं होतं. त्यांनी समाजाचं प्रबोधन केलं. त्यांनी मोठी सामाजिक सुधारणा केली होती. चंद्रशेखर बावनकुळे यांना महाराष्ट्राच्या सांस्कृतीशी काही घेणंदेणं नाही. त्यांनी महाराष्ट्राचा अभ्यास करावा. डफावर जी थाप पडते तीच थाप यांच्या कानाखाली पडल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाच त्याांनी चढवला.

मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?.
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.