AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवीन माहिती समोर, आरोपीचा हत्येच्या वेळी ग्रुपवर व्हिडिओ कॉल

Beed Santosh Deshmukh murder case: ग्रुपवरील व्हिडिओ कॉलचा हा पुरावा मुंबई सीआयडीने चार्जशीटमध्ये दिला आहे. ग्रुपवर व्हिडिओ कॉल करणारा आरोपी कृष्णा आंधळे कुठे आहे? त्याचा शोध अजून लागला नाही. तो पोलिसांना अजून सापडला नाही.

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवीन माहिती समोर, आरोपीचा हत्येच्या वेळी ग्रुपवर व्हिडिओ कॉल
Santosh DeshmukhImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Mar 04, 2025 | 9:32 PM
Share

Santosh Deshmukh Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात रोज नवीन माहिती उघड होत आहे. या प्रकरणात मंगळवारी मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. आरोपींनी किती क्रूर आणि अमानुषपणे संतोष देशमुख यांची हत्या केली, ते उघड होत आहे. संतोष देशमुख यांची हत्या करताना आरोपींनी ग्रुपवर व्हिडिओ कॉल केला होते, हे सीआयडीच्या चार्जशीटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांची होत असलेली हत्या अनेक लोकांनी त्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाहिली असण्याची शक्यता आहे.

मोकारपंथी ग्रुपवर व्हिडिओकॉल

आरोपींकडे मोकारपंथी नावाचाव्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहे. त्या ग्रुपवर व्हिडिओ कॉल केला होता. कृष्णा आंधळे याने हा व्हिडिओ कॉल केला होता. संतोष देशमुख याला कशा पद्धतीने मारत आहोत, हे त्याने त्या व्हिडिओ कॉलमधून दाखवले होते. काही मिनिटे हा व्हिडिओ कॉल सुरु होता. ग्रुपवरील व्हिडिओ कॉलचा हा पुरावा मुंबई सीआयडीने चार्जशीटमध्ये दिला आहे. ग्रुपवर व्हिडिओ कॉल करणारा आरोपी कृष्णा आंधळे कुठे आहे? त्याचा शोध अजून लागला नाही. तो पोलिसांना अजून सापडला नाही.

संतोष देशमुख यांची हत्या करताना आरोपींना सर्व मानवी संवेदना सोडल्या होत्या. क्रूरपणाचा कळस गाठला होता. ते व्हिडिओ कॉलमधून दिसत आहे. संतोष देशमुख यांचे कपडे काढून त्यांना विवस्त्र करुन मारहाण केली होती. त्याचे १५ व्हिडिओ आणि ८ फोटो पोलिसांना मिळाले आहे. या हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड वाल्मिक कराड असल्याचे समोर आले आहे.

राज्यभरात आंदोलन

दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा व्हिडिओसमोर आल्यानंतर राज्यामध्ये संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन त्यांना फाशी झाली पाहिजे, अशी घोषणाबाजी मराठा आंदोलकांनी केली. लातूरमध्ये मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी रस्त्यावर उतरत हत्या प्रकरणातील आरोपींचे फोटो जाळले आहेत. तसेच धनजंय मुंडे यांच्या विरोधातील घोषणबाजी करण्यात आली आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.