संतोष देशमुख हत्याप्रकरणी १७ जूनला पुढील सुनावणी, वाल्मिक कराडच्या अर्जावर युक्तिवाद होणार
संतोष देशमुख हत्याप्रकरणी आज सुनावणी पार पडली, विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी आज सरकारी पक्षाची बाजू मांडली, आता याप्रकरणी पुढील सुनावणी १७ जूनला होणार आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण संपूर्ण देशभरात गाजले होते. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी आज सुनावणी पार पडली, यात या हत्याकांडाचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडने मला मकोकातून दोषमुक्त करा असा युक्तिवाद वकिलांच्या मार्फत केला. आता यावर १७ जूनला पुढील सुनावणी वेळी युक्तिवाद होणार आहे.
संतोष देशमुख हत्याकांडाची पुढील सुनावणी १७ जूनला होणार
आज झालेल्या सुनावणीनंतर विशेष सरकारी वकील उज्जवल निकम यांनी सांगितले की, संतोष देशमुख हत्याप्रकरणाची पुढील सुनावणी १७ जूनला होणार आहे. वाल्मिक कराडने आज वकिलामार्फत अर्ज करत मला मकोका अंतर्गत दोषमुक्त करा अशी मागणी केली. यावर आता १७ जूनला युक्तिवाद होणार आहे. तसेच न्यायालयात प्रलंबित असणाऱ्या अर्जांवर त्या युक्तिवाद होणार आहे.
हे प्रकरण नेमकं काय आहे?
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. देशमुख यांच्या भावाच्या फिर्यादीनंतर केज पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या हत्याकांडानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. तसेच या हत्येमागे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा आरोप अनेक राजकीय नेत्यांनी केला होता.
कालांतराने या प्रकरणात वाल्मिक कराडचा हात असल्याचे समोर आले, त्यानंतर कराड पोलिसांना शरण आला व त्याच्यावरही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. सध्या या प्रकरणातील सर्व आरोपी तुरुंगात आहेत, आता १७ जूनला होणाऱ्या सुनावणीत कोर्ट काय निर्णय देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
