सप्तशृंगी देवी संस्थानने घेतला महत्वपूर्ण निर्णय, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 15 दिवस असणार विशेष मुभा

सध्या दिवाळीनिमित्ताने शाळकरी मुलांना सुट्ट्या आहेत, अनेक जण लक्ष्मीपूजानंतर सहलीला किंवा देवदर्शनाला जात असल्याने सप्तशृंगी संस्थानने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

सप्तशृंगी देवी संस्थानने घेतला महत्वपूर्ण निर्णय, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 15 दिवस असणार विशेष मुभा
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Oct 26, 2022 | 9:19 PM

Nashik News : साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धेपीठ म्हणून ओळख असलेल्या सप्तशृंगी देवीचे दर्शन (Saptashrungi Temple) पुढील पंधरा दिवस 24 तास दर्शन घेता येणार आहे. दिवाळीच्या (Diwali Festival) काळात सुट्ट्या असल्याने अनेक जणांना गेली दोन वर्षे कोरोनामुळे दर्शन घेण्याकरता जाता आले नव्हते, त्यानंतर मंदिरासह मूर्तीकरिता काही दिवस मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. सध्या आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे दिवाळी उत्सव निमित्ताने मोठी गर्दी होते आहे. अनेक भाविक दर्शनासाठी रांगा लावून असल्याने मंदिर प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. गुरुवार पासून म्हणजेच दिनांक 27 ऑक्टोबर 2022 पासून 13 नोव्हेंबर 2022 पर्यन्त दर्शनासाठी मंदिर 24 तास खुले राहणार आहे. भाविकांना दिवाळीच्या निमित्ताने दर्शनाची विशेष सुविधा सुरू करून दिली आहे.

सध्या दिवाळीनिमित्ताने शाळकरी मुलांना सुट्ट्या आहेत, अनेक जण लक्ष्मीपूजानंतर सहलीला किंवा देवदर्शनाला जात असल्याने सप्तशृंगी संस्थानने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर हे गुरुवार पासून म्हणजेच दिनांक 27 ऑक्टोबर 2022 पासून 13 नोव्हेंबर 2022 पर्यन्त दर्शनासाठी मंदिर 24 तास खुले राहणार आहे.

हे सुद्धा वाचा

दरवर्षी राज्यातील परराज्यातील भाविक श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात.

दोन वर्षापासून कोरोना संसर्गजन्य परिस्थितीमुळे दर्शनासाठी येवू न शकलेले भाविक आणि सध्याची परिस्थिती विचारात घेऊन पंधरा दिवसासाठी 24 तास मंदिर सुरू राहणार आहे.

दरम्यान, 24 तास मंदिर खुले ठेवतांना भक्तनिवास, सुरक्षा रक्षण आणि इतर कर्मचारी यांची विभागणी करण्यात आली असून दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.

आवश्यक मनुष्यबळ आणि फ्युनीकुलर ट्रॉली सुविधा देखील भाविकांकरिता सुरू राहणार असून भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.