उदयनराजेंविरोधात पवारांचा खास मोहरा मैदानात, स्वत: शरद पवार फॉर्म भरायला जाणार

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी (Satara Loksabha Bypoll) भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले (Shriniwas Patil vs Udayanraje Bhosale) यांच्याविरोधातील आघाडीचा उमेदवार ठरला आहे.

उदयनराजेंविरोधात पवारांचा खास मोहरा मैदानात, स्वत: शरद पवार फॉर्म भरायला जाणार

सातारा :  सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी (Satara Loksabha Bypoll) भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले (Shriniwas Patil vs Udayanraje Bhosale) यांच्याविरोधातील आघाडीचा उमेदवार ठरला आहे. (Satara Loksabha Bypoll)  काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नकार दिल्याने, राष्ट्रवादीने इथे आपलाच उमेदवार दिला आहे. माजी खासदार आणि माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे साताऱ्यात आता राजे विरुद्ध माजी राज्यपाल अशी लढत पाहायला मिळणार आहे. गुरुवारी 3 ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत श्रीनिवास पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

21 ऑक्टोबरला सातारा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचं मतदान होणार असून विधानसभेसोबतच म्हणजेच 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यामुळे साताऱ्याच्या जागेसाठी उदयनराजे भोसले विरुद्ध श्रीनिवास पाटील अशीच लढत होणार आहे. सुरुवातीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस पोटनिवडणुकीत उतरवणार असल्याची चर्चा (Satara Loksabha Bypoll Hold) होती.

श्रीनिवास पाटील दोन वेळा जुन्या कराड लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून श्रीनिवास पाटील यांची ओळख आहे. श्रीनिवास पाटील यांच्या उमेदवारीमुळे उदयनराजेंसमोर मोठे आव्हान उभे राहू शकतं.

कोण आहेत श्रीनिवास पाटील?

  • श्रीनिवास पाटील अगोदर आयएएस (भारतीय प्रशासकीय सेवा) अधिकारी होते.
  • शरद पवारांनी श्रीनिवास पाटील यांना राजकारणात आणलं
  • श्रीनिवास पाटील हे 1999 ते 2004 आणि 2004 ते 2009 या काळात लोकसभा खासदार होते
  • 1 जुलै 2013 ते 26 ऑगस्ट 2018 या काळात सिक्कीमचे राज्यपाल म्हणून काम
  • राज्यपालपदाची कारकीर्द संपल्यानंतर पुन्हा पक्षासाठी काम सुरु

मे 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचा पराभव केला होता.  उदयनराजेंना 5 लाख 79 हजार 26 मतं, तर नरेंद्र पाटील यांना 4 लाख 52 हजार498 मतं मिळाली. उदयनराजे भोसले यांनी मागील 2014 च्या निवडणुकीत जवळपास साडेतीन लाख मतांनी विजय मिळवला होता. मात्र यंदा त्यांची आघाडी निम्म्याने घटली. 2014 मध्ये उदयनराजे भोसले 3 लाख 66 हजार 594 मतांनी विजयी झाले होते. यंदा उदयनराजेंना इतकं लीड घेता आलं नाही. 2019 च्या निवडणुकीत राजेंना 1,26,528 मतांनी विजय मिळवता आला.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा

महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly Poll Dates) निवडणुकांचं बिगुल अखेर 21 सप्टेंबरला वाजलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. महाराष्ट्रातील सर्व 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखा (Maharashtra Assembly Election Announcement) जाहीर केल्या. यासोबतच दोन्ही राज्यांत आचारसंहिता लागू झाली.

संबंधित बातम्या 

शरद पवारांचा खास मोहरा मैदानात, उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार जवळपास निश्चित  

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *