भाजप महिला सरपंचाला विजयी मिरवणूक पडली महागात, 52 जणांवर गुन्हा दाखल

ग्रामपंचायत निवडणुका पार पडण्याआधीच सरपंच लक्ष्मी पानसरे यांनी भव्य अशी विजय रॅली काढली. हा अतिउत्साह त्यांना चांगलाच महागात पडला आहे.

भाजप महिला सरपंचाला विजयी मिरवणूक पडली महागात, 52 जणांवर गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 8:07 PM

सातारा : राज्यात एकीकडे मुंबई महापालिका निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापलं असताना आता ग्रामपंचायत निवडणुकांसाठीही राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यामध्येच अतिउत्साह दाखवल्यामुळे साताऱ्यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिरवळ ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच लक्ष्मी पानसरे यांच्यासह 52 जणांवर विजयी मिरवणूक काढल्याप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Satara winner rally held by woman sarpanch case against 52 persons)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायत निवडणुका पार पडण्याआधीच सरपंच लक्ष्मी पानसरे यांनी भव्य अशी विजय रॅली काढली. हा अतिउत्साह त्यांना चांगलाच महागात पडला आहे. कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन करत आणि निवडणुकांच्याही नियमांचं पालन न केल्यामुळे लक्ष्मी पानसरे यांच्यासह 52 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याआधी लक्ष्मी पानसरे यांच्यावरील अविश्वास ठराव फेटाळल्यानंतर पुन्हा एकदा सरपंच पदी विराजमान झालेल्या लक्ष्मी पानसरे यांची शुक्रवारी शिरवळ शहरातून भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. दरम्यान, सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्हयात शस्त्र व जमाव बंदी लागू केली असताना ही विजयी मिरवणुक काढल्या प्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात सरपंच लक्ष्मी पानसरे यांच्यासह 52 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, राज्यात सध्या आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. राज्यातील महाविकास आघाडी, भाजप, वंचित बहुजन आघाडीपाठोपाठ आता मनसेनेही ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीसाठी येत्या 23 डिसेंबरपासून उमदेवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्षांना आपल्या भागातील ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचा उमेदवार उभा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवण्याच्या सूचनाही राज यांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापित सुमारे एकूण 14,234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम संगणकीकृत पद्धतीनं राबविणार असल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. कोरोनाच्या साथीच्या आजाराच्या संसर्गाची गंभीर परिस्थिती उद्भवल्यानं मार्च 2020मध्ये सुमारे 1566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका निवडणूक आयोग्याच्या आदेशानुसार 17 मार्च 2020ला स्थगित करण्यात आल्या होत्या.

आता निवडणूक आयोगानं 20 नोव्हेंबर 2020च्या आदेशान्वये एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमानुसार संबंधित जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार 1 डिसेंबर 2020 रोजी सुमारे 14234 ग्रामपंचायतींसाठी प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली असून, 7 डिसेंबर 2020पर्यंत त्यावर हरकती घेण्यात आल्या आहेत. 9 डिसेंबरच्या सुधारित कार्यक्रमानुसार अंतिम मतदारयादी 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. (Satara winner rally held by woman sarpanch case against 52 persons)

संबंधित बातम्या –

ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेला एक नंबरचा पक्ष करा, उद्धव ठाकरेंचे आदेश

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा, 21 लाखांचा निधी मिळवा, आ. लंकेंच्या पावलावर या आमदाराचं पाऊल!

(Satara winner rally held by woman sarpanch case against 52 persons)

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.