धक्कादायक ! साताऱ्यात माजी सरपंचाची वनरक्षक दाम्पत्याला मारहाण, घटनेत गर्भवती महिला वनरक्षक जखमी

धक्कादायक ! साताऱ्यात माजी सरपंचाची वनरक्षक दाम्पत्याला मारहाण, घटनेत गर्भवती महिला वनरक्षक जखमी
साताऱ्यात माजी सरपंचाची वनरक्षक दाम्पत्याला मारहाण

या मारहाणीच्या घटनेने वन विभागात आणि जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात असून मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मारहाणीनंतर आरोपी पती पत्नी घटनास्थळावरुन फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तयार करुन आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहे.

संतोष नलावडे

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 19, 2022 | 9:08 PM

सातारा : क्षुल्लक कारणावरुन माजी सरपंच आणि त्याच्या पत्नीने मिळून वनरक्षक दाम्पत्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना आज साताऱ्यात घडली आहे. हे दोघे पती पत्नी साताऱ्यातील पळसवडे गावचे रहिवासी आहेत. रामचंद्र जानकर आणि प्रतिभा जानकर अशी आरोपींची नावे आहेत. जानकर दाम्पत्याने महिला वनरक्षक सिंधू सानप आणि त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही वनरक्षक महिला 4 महिन्यांची गर्भवती असून त्यांच्या पोटात लाथा मारण्यात आल्या तर डोक्यात दगड देखील मारल्याने त्या रक्तबंबाळ झाल्या आहेत. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मारहाणीच्या घटनेने वन विभागात आणि जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.

न विचारता मजूर दुसरीकडे नेले म्हणून मारहाण

मला न विचारता मजूर दुसरीकडे का नेले या कारणातून चिडून जाऊन वन समितीचे अध्यक्ष आणि पळसवडे गावचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यांनी आणि त्यांची पत्नी प्रतिभा जानकर यांनी गर्भवती महिला वन रक्षक सानप यांना मारहाण केली आहे. मारहाण करणाऱ्या सरपंचाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या मारहाणीच्या घटनेने वन विभागात आणि जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात असून मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मारहाणीनंतर आरोपी पती पत्नी घटनास्थळावरुन फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तयार करुन आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहे.

वसईतही टवाळखोरांकडून इसमाला मारहाण

वसईत अपघातात मदत करणाऱ्या व्यक्तीलाच टवाळखोर तरुणांनी धक्काबुकीं करत मारहाण केल्याची घटना आज घडली आहे. वसई पश्चिमेच्या माणिकपूर परिसरातील 100 फूट रोडवर आज दुपारी 4:30 वाजता ही घटना घडली आहे. टवाळखोर तरुणांनी भरघाव वेगात जाऊन, स्कुटीवर असणाऱ्या दाम्पत्याला उडविले होते. यात स्कुटीवरील पती-पत्नी आणि लहान मूल खाली पडले. यात पत्नी किरकोळ जखमीही झाली. बाजूनेच जाणाऱ्या एका सतर्क नागरिकांनी दाम्पत्याला जाऊन मदत करत तरुणांना जाब विचारला असता या टवाळखोरांनी त्या व्यक्तीला मारहाण केली आहे. माणिकपूर पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवलं असून, मारहाण करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतले आहे. (Ex-Sarpanch’s forest ranger beats couple in Satara, Pregnant woman forest ranger injured in the incident)

इतर बातम्या

Video | ज्या वॉचमनकाकांकडे डुग्गूला सोडलं, त्यांनी टीव्ही 9शी बोलताना काय सांगितलं?

Mumbai Crime : मुंबईतील धारावीत नात्याला काळिमा, अल्पवयीन मुलीवर वडिल आणि भावाकडून अत्याचार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें