‘…अन्यथा कोयनेची वीज बंद करणार’, खासदार उदयनराजे यांचा आपल्याच सरकारला मोठा इशारा

जो पर्यंत धरणग्रस्तांचे प्रश्न सुटत नाहीत तो पर्यंत वीज देणार नाही. तुमच्या भावी पिढीला तरी न्याय मिळाला पाहिजे असं मतंही उदयनराजे यांनी व्यक्त केले.

'...अन्यथा कोयनेची वीज बंद करणार', खासदार उदयनराजे यांचा आपल्याच सरकारला मोठा इशारा
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 8:26 PM

कराडः कोयनानगर येथे डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्त्वाखाली दोन दिवसांपासून सुरु असणाऱ्या कोयना धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्तांच्या ठिय्या आंदोलनाला उदयनराजे यांनी भेट देऊन धरणग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी बोलताना त्यांना सांगितले की, कोयना प्रकल्पग्रस्तांविषयी मला वेदना होतात. वेदना होतात कारण आज 60 वर्षे होऊनही धरणग्रस्तांचा हा प्रश्न डॉ भारत पाटणकर यांच्याकडून मांडला जात आहे. कृष्णा खोरे प्रकल्पाचा उपाध्यक्ष असतानाही वेगळ्या कल्पना सुचला होत्या. त्यावेळी लोकांचे भले होईल असंही त्यावेळी वाटत होते.

जो पर्यंत धरणग्रस्तांचे प्रश्न सुटत नाहीत तो पर्यंत वीज देणार नाही. तुमच्या भावी पिढीला तरी न्याय मिळाला पाहिजे असं मतंही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

आज जेवढी राज्यात धरणे झाली त्या धरणग्रस्तांचा मोठा त्याग आहे. आगोदर जन्माला आलो असतो तर हा प्रश्न मागेच सुटला असता. कारण त्यावेळच्या राज्यकर्तानी बोध घेतला पाहिजे होता.

कारण आज जो महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे तो या धरणग्रस्तांमुळेच आहे अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्या वेळी भोळ्याभाबड्या जनतेने आपल्या जमिनी देऊन त्याग केला, त्याला आज सहा तपं होऊन गेली आहेत.

तरीही त्यांनी न्याय मिळाला नाही. त्यामुळे धरणग्रस्तांची प्रगती थांबली, त्यावेळेस एका बाजूला धरण तर दुसर्‍या बाजूला पुर्नवसन हा निर्णय घेतला पाहिजे होता असंही त्यांनी यावेळी सांगितले.

डॉ. भारत पाटणकर यांनी शासनाकडे अनेकदा धरणग्रस्तांची व्यथा मांडली मात्र प्रत्येक वेळी आश्वासन, आश्वासनच फक्त देण्यात आली असं म्हणत तत्कालीन सरकारवरही त्यांनी टीका केली.

धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाला एवढी वर्षे का लागली हा सवाल उपस्थित करून त्यांनी ही भोळीभाबडी लोक आहेत. त्यांच्यामुळेच आज राज्य प्रगती करू शकले असले तरी धरणग्रस्तांचे प्रश्न आज जैसे थे आहेत.

आजही या धरणग्रस्तांच्या या प्रश्नांमुळे घृणा आणि किळस वाटते आहे. गेल्या साठ वर्षापासून ही लोकं आयुष्यभर आंदोलन, मोर्चे काढत आहेत, तरीही अधिकारी लोकांना त्यांचे काही देणे घेणे नाही.

सध्या अधिवेशन सुरू आहे त्यामुळे मी निश्चीतपणे या शासनाबरोबर मी चर्चा करणार आहे. धरणग्रस्तांच्या भविष्यकाळासाठी हे झालंच पाहिजे. यासाठी मी व डॉ. भारत पाटणकर आवाज उठवित आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यातील इतर धरणांचे प्रश्न मार्गी लागत आहेत मात्र महाराष्ट्राचा कणा असलेल्या कोयना धरणग्रस्तांचे प्रश्न सुटत नाहीत, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

जो पर्यंत धरणग्रस्तांचे प्रश्न सुटत नाहीत तो पर्यंत वीज देणार नाही. तुमच्या भावी पिढीला तरी न्याय मिळाला पाहिजे असं मतंही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

तुमची ही अवस्था बघवत नाही, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर यांबाबत मी चर्चा करणार असल्याचे अश्वासनही यावेळी देण्यात आले.

लोकप्रतिनिधी म्हणून लोकांचे प्रश्न सोडवू शकलो नाही तर त्या पदावर राहण्यात काही अर्थ नाही, माझी बांधीलकी तत्वांशी आहे, तुमच्याशी आहे, वाटेला त्या परिस्थितीत मी येथून बाहेर वीज जाऊ देणार नाही, तुम्ही लोक लोकशाहीतले राजे आहात, तुम्ही राज्यकर्ताना का विचारल नाही.

त्या वेळी फित कापायला आलेल्यांनी का प्रश्न सोडविला नाही, का इच्छाशक्ती नव्हती का? वीज कट केली की सगळे इथे येतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

यावेळी चैतन्य दळवी यांनी सांगितले की, कोयना, तारळी, वांग-मराठवाडी, उरमोडी वाटत कब्जा हक्काचा आहे. अन्यायकारक शासन निर्णय रद्द झाला पाहिजे व कोयना धरणासह जमीन वाटप लवकरात लवकर झालं पाहिजे जो पर्यंत जमीन वाटप होत नाही तोपर्यंत जीव गेला तर बेहात्तर पण आता मागं हटणार नाही असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.