AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूत्र घेताच शालेय शिक्षणमंत्री थेट शाळांमध्ये, अचानक तपासणीमुळे समजल्या ‘ग्राऊंड लेव्हल’च्या समस्या

Dada Bhuse School Visit: शालेय शिक्षण विभागात रिझल्ट ओरिएंटेड काम दिसणार आहे. शिक्षण विभाग शाळेच्या दारी यापुढे दिसणार आहे. एकंदरीत गरिबातील गरीब विद्यार्थ्याला चांगले शिक्षण मिळवण्याचा प्रयत्न आपण सर्व मिळून करू. विद्यार्थी, पालक, संस्था यांना विश्वासात घेऊन काम करू.

सूत्र घेताच शालेय शिक्षणमंत्री थेट शाळांमध्ये, अचानक तपासणीमुळे समजल्या 'ग्राऊंड लेव्हल'च्या समस्या
दादा भुसे यांनी शाळांना भेटी दिल्या.
| Updated on: Dec 23, 2024 | 1:39 PM
Share

Dada Bhuse School Visit: राज्यातील फडणवीस मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले. त्यानंतर सोमवारी मंत्रालयात जाऊन अनेक मंत्र्यांनी पदभार घेतले. परंतु शालेय शिक्षण मंत्रीपदाची नवीन जबाबदारी मिळालेले दादा भुसे थेट शाळांमध्ये पोहचले. मालेगाव तालुक्यातील शाळांमध्ये त्यांनी अचानक भेटी दिल्या. त्या भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांकडून वाचन करुन घेतले. शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या. शाळेतील सोयीसुविधांचा आढावा घेतला.

शालेय शिक्षण मंत्री पदाची शपथ घेऊन परतल्यानंतर पहिल्याच दिवशी मंत्री दादा भुसे ॲक्टिव्ह मोडवर आले आहेत. मंत्रिपदाचे वाटप झाल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी शाळांना अचानक दिल्या भेटी दिल्या. शालेय आरोग्य, आरोग्य तपासणी, विद्यार्थी पोषण आहार यांची माहिती घेतली. विद्यार्थी अन् शिक्षकांच्या अडचणी जाणून घेतल्या.

शाळांना शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी अचानक भेटी दिल्या. शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी काम करण्याचे सूतोवाच त्यांनी दिले होते. त्यामुळे शाळा भेटीतून आधी समस्या समजून घेतल्या. मालेगाव तालुक्यातील देवरपाडे गावातील शाळेत ते पोहचले. त्यांनी विद्यार्थ्यांकडून वाचन करुन घेतले. कविता म्हणून घेतल्या. मराठी आणि इंग्रजी कविता विद्यार्थ्यांनी म्हटल्या. विद्यार्थी, शिक्षकांच्या समस्या समजून घेतल्या.

खासगी शाळांचा सुविधा देणार

शाळेच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना दादा भुसे म्हणाले, वर्षभरात संपूर्ण विभागात बदल दिसणार आहे. सर्वच शाळांचा दर्जा सुधारला जाणार आहे. ज्या सुविधा खासगी शाळांकडे आहे, त्या सुविधा आम्ही ग्रामीण भागातील शाळांमध्ये देणार आहोत. इंग्रजी माध्यमांकडे जाणारे विद्यार्थी आमच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी नंबर लावतील. शाळा भेटी दरम्यान विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आल्याचे दिसून आले आहे. यावेळी काही सोयी, सुविधांची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्या सुविधा येत्या काळात त्यांना देण्यात येईल.

शालेय शिक्षण विभागात रिझल्ट ओरिएंटेड काम दिसणार आहे. शिक्षण विभाग शाळेच्या दारी यापुढे दिसणार आहे. एकंदरीत गरिबातील गरीब विद्यार्थ्याला चांगले शिक्षण मिळवण्याचा प्रयत्न आपण सर्व मिळून करू. विद्यार्थी, पालक, संस्था यांना विश्वासात घेऊन काम करू. अनेक गावांतील शाळांचा दर्जा सुधारला आहे. त्यांचे अनुकरण इतर ठिकाणी करण्यात येईल, असे दादा भुसे यांनी म्हटले आहे.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.