लातूरातील शाळा-महाविद्यालये बंद, क्लासेस पुन्हा ऑनलाईन, काय आहेत जिल्हाधिकारी यांचे आदेश?

गेल्या चार दिवसांपासून लातूर जिल्ह्यातही कोरोना रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढत आहे. दिवसाला 100 रुग्णांची भर पडत असल्याने आता निर्बंध लादण्यास सुरवात झाली आहे. त्यानुसारच जिल्ह्यातील शाळा- महाविद्यालये तसेच खासगी कोचिंग क्लासेसही सोमवार (10 जानेवारी) पासून बंद राहणार आहेत.

लातूरातील शाळा-महाविद्यालये बंद, क्लासेस पुन्हा ऑनलाईन, काय आहेत जिल्हाधिकारी यांचे आदेश?
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 4:35 PM

लातूर : गेल्या चार दिवसांपासून (Latur) लातूर जिल्ह्यातही कोरोना रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढत आहे. दिवसाला 100 रुग्णांची भर पडत असल्याने आता निर्बंध लादण्यास सुरवात झाली आहे. त्यानुसारच जिल्ह्यातील शाळा- महाविद्यालये तसेच ( private coaching classes) खासगी कोचिंग क्लासेसही सोमवार (10 जानेवारी) पासून बंद राहणार आहेत. खासगी कोचिंग क्लासेस करिता सबंध मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने विद्यार्थाी दाखल झालेले असतात. मात्र, (Corona Patient) वाढती रुग्णसंख्या पाहता जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी नवे आदेश काढले असून 15 फेब्रुवारी पर्यंत हे शाळा महाविद्यालये आणि खासगी क्लासेस बंद राहणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे टिव्हीशन भागात पुन्हा शुकशुकाट पाहवयास मिळणार आहे.

निर्बंध लागू, नियमांची अंमलबजावणी

सोमवारपासून रात्रीची संचारबंदी आणि दिवासाची जमाव बंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार अंमलबजावणीच्या पहिल्या दिवशी मनपा आणि पोलीस प्रशासनातील कर्माचारी नियमांची अंमलबजावणीसाठीचे प्रयत्न करीत होते. आतापर्यंत केवळ तोंडी नियम सांगतिले जात होते. पण आता मास्क न घातल्यास 500 दंड आकारण्यास सुरवात झाली होती. शिवाय सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.

हे आहेत नवे नियम

नव्या नियमावलीबाबत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी रविवारी आदेश जारी केले आहेत. सर्वसामान्य नागरिकांनाही शासकीय कार्यालयात जायचे असल्यास कार्यालयातील प्रमुखाची परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. खासगी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांचे दोन्हीही डोस पूर्ण झालेले असायला हवेत, अंत्यविधीसाठी केवळ 20 जणांनाच परवानगी देण्यात आली आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा, महाविद्यालये ही बंद राहणार असून केवळ दहावी आणि बारावीच्या शैक्षणिक कामकाजाला नियमांच्या अधीन राहून शिक्षण विभागाला कार्यवाही करता येणार आहे. मास्क म्हणून रुमाल, गमजा हे आता चालणार नाही. तर मास्क नसल्यास 500 रुपये दंड आकरण्यात येणार आहे.

क्लासेस पुन्हा ऑनलाईनच

लातूर शहरात क्लासेस करिता 15 ते 20 हजार विद्यार्थी वास्तव्यास असतात. मात्र, गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे कधी नव्हे ते क्लास देखील ऑनलाईनच्या माध्यमातून घ्यावे लागत आहेत. गतवर्षीही शहरातील सर्वच क्लासेस चालकांनी नियमांची अंमलबजावणी करीत ऑनलाईन पध्दतीचा स्वीकार केला होता. आता पुन्हा हीच पध्दत अवलंबवावी लागणार असून शहरातील मुख्य रस्त्यांवर पुन्हा शुकशुकाट पाहवयास मिळणार आहे.

संबंधित बातम्या :

Latur Market : हमीभाव केंद्र सुरु होताच तुरीच्या बाजारभावात मोठे बदल, सोयाबीन दर मात्र, स्थिरच

Onion : सोलापूरच्या बाजारपेठेत कांद्याची विक्रमी आवक अन् दरात घसरण, नेमके कशामुळे बिघडले भावाचे गणित?

मांजरा नदीकाठावर पोहचले लातूरचे जिल्हाधिकारी, मात्र त्यापुढचा प्रवास थेट कल्हईतून, नेमके काय कारण?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.