शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीची दुचाकीला धडक

पवारांच्या ताफा भारसिंगीवरुन खापाकडे निघाला होता. त्यावेळी पुढच्या गाडीची तरुणाच्या दुचाकीला धडक बसली. हा अपघात झाला त्यावेळी शरद पवारांची गाडी मागे होती.

शरद पवारांच्या ताफ्यातील गाडीची दुचाकीला धडक

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar convoy accident) हे परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भागाचा दौरा करत आहेत. शरद पवार (sharad pawar convoy accident) आज विदर्भातील नागपुरात आहे. या दौऱ्यात शरद पवार यांच्या ताफ्यातील एका गाडीची दुचाकीला धडक होऊन अपघात झाला. नागपूर जिल्ह्यातील जामगाव परिसरातून पवारांचा ताफा जात होता, त्यावेळी एका गाडीची दुचाकीला धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे.

पवारांच्या ताफा भारसिंगीवरुन खापाकडे निघाला होता. त्यावेळी पुढच्या गाडीची तरुणाच्या दुचाकीला धडक बसली. हा अपघात झाला त्यावेळी शरद पवारांची गाडी मागे होती.

पवारांना वाळलेल्या पिकांचा बुके

ओल्या दुष्काळातलं शेतकऱ्यांचं दुःख कळावं, व्यथा सरकारपर्यंत पोहोचाव्या, म्हणून खामगांव येथील शेतकऱ्यांनी शरद पवार यांना शेतीतील वाळलेल्या पिकांचा बुके दिला. वाळलेले कपाशीचे बोंडं, आणि सडलेल्या संत्र्याचा बुके पवारांकडे देऊन शेतकऱ्यांनी यावेळी कर्जमाफीची मागणी केली.

पवारांचा नागपूर दौरा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात त्यांनी आज सुरुवातीला नागपूर जिल्ह्यातील चारगाव आणि परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी काटोल अर्जुनगर गावातील वानखेडे या शेतकऱ्यांच्या संत्राबागेतील नुकसानीची पाहणी केली.

ओला दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे काटोल शेजारच्या विक्रम वानखेडे यांच्या संत्राबागेचं मोठं नुकसान झालं आहे. संत्रा गळ वाढल्याने व्यापाऱ्याने त्यांच्या संत्राबागेचा सौदा रद्द केला आहे. त्यांना आठ लाख रुपयांचं नुकसान झालं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावात शरद पवार

मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावाला शरद पवारांनी भेट दिली. यावेळी शेतकऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं स्वागत केलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *