AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र लढण्यावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया काय? महायुतीचं काय होणार? पवारांच्या विधानाने चर्चांना जोर

Sharad Pawar on Raj Thackeray and Uddhav Thackeray : नुकताच शरद पवार यांनी सरकारला शेतकऱ्यांना लवकर मदत करा असे म्हणते राज्यातील अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी ते मराठा आणि ओबीसी समाजातील आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना देखील दिसले.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र लढण्यावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया काय? महायुतीचं काय होणार? पवारांच्या विधानाने चर्चांना जोर
Sharad Pawar
| Updated on: Sep 18, 2025 | 10:24 AM
Share

नुकताच शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये एक पत्रकार परिषद घेऊन अनेक विषयांवर भाष्य केले. मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र निवडणुका लढतील, अशी चर्चा आहे आणि तसे संकेतही त्यावर शरद पवार यांनी मोठे भाष्य केले. फक्त हेच नाही तर अनेक वर्षांनंतर दोघा भावांचे मनोमिलन होताना अख्ख्या राज्याने बघितले. अनेक वर्षांनंतर राज ठाकरे यांच्या घरच्या गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे हे संपूर्ण परिवारासह पोहोचले होते. दोघा भावांना एकाच मंचावर पाहून शिवसैनिकांचे मन भरून आले. शेवटी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत असल्याने बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण होताना दिसतंय. आता शरद पवार यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र निवडणूक लढण्याच्या मुद्द्यावर भाष्य केले.

शरद पवार म्हणाले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले तर आम्हाला आनंद आहे. महाविकास आघाडीवर याचा काही परिणाम होणार नाही. दोघांचीही मुंबईत ताकद आहे त्याचा आम्हाला फायदा होईल. आगामी काळातील महापालिकेच्या निवडणुका मनसे आणि उबाठा गट एकत्र लढण्याची दाट शक्यता आहे. दोघे भाऊ एकत्र येऊन आपआपल्या पक्षाची ताकद दाखवतील. यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये एक वेगळे समीकरण बघायला मिळेल.

शरद पवार यांनी मराठा आरक्षणासंदर्भातलही भाष्य केले. त्यांनी म्हटले की,  हैद्राबाद गॅजेट एक दिशा दाखवत आहे. मला याची कॉपी मिळाली आहे. सामंजस्य राहावं, एकीची वीण कायम रहावं हे सगळ्यांनाच वाटतं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भुजबळ यांनी एकत्र बसून राज्यात सामंजस्य राहावे यासाठी प्रयत्न करावेत. कारण गावागावात कटुता निर्माण झाली आहे आणि हे घातक नक्कीच आहे. विखेंची समितीमध्ये सगळ्या जातीचे सदस्य आहेत.

दुसरीकडे, बावनकुळे यांच्या समितीत सगळे ओबीसी सदस्य आहेत. अशात सामाजिक कटुता कशी कमी होईल. राज्याच्या हितासाठी असलेल्या मार्गाने जावं लागेल. हाके किंवा आणखी लोक काही बोलतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात कटुता निर्माण झाली आहे. कटुता इतकी निर्माण झाली आहे की, एकमेकांच्या व्यवसायाकडे लोक जात नाहीत. हे चित्र महाराष्ट्रात कधीही नव्हते.

Follow Us
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी..
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी सांगितली मोठी माहिती
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट...
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट परीक्षेला बसण्यास बंदी
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर..
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर यांनीही घेतले दर्शन
गेल्या 10 महिन्यांतच 14 वेळा तक्रार, निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद...
गेल्या 10 महिन्यांतच 14 वेळा तक्रार, निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद, नेमकं प्रकरण काय?
धनुष्यबाण कुणाचं? शिवसेना पक्षचिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी,
धनुष्यबाण कुणाचं? शिवसेना पक्षचिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, नेमकं...
विठुरायाच्या दर्शनासाठी 3 दिवस प्रतीक्षा! पंढरपूर मंदिर बंद, कारण काय?
विठुरायाच्या दर्शनासाठी 3 दिवस प्रतीक्षा! पंढरपूर मंदिर बंद, कारण काय?