बाप तो बाप रहेगा… पावसातील फोटो; शरद पवार यांच्या सभेपूर्वी अजितदादांना डिवचलं

देशभरात परवा 7 तारखेला लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. आज संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात सुद्धा तिसऱ्या टप्प्याच मतदान होणार आहे. या लोकसभा मतदार संघात अत्यंत चुरशीची लढत होणार आहे.

बाप तो बाप रहेगा... पावसातील फोटो; शरद पवार यांच्या सभेपूर्वी अजितदादांना डिवचलं
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 05, 2024 | 4:56 PM

बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता होणार आहे. शेवटच्या दिवसाच्या प्रचारासाठी शरद पवार गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. सुप्रिया सुळे यांच्यासाठी शरद पवार यांची बारामतीत मोठी सभा होणार आहे. ज्या ठिकाणी सभा होणार आहे, त्या सभेच्या ठिकाणी अनेक पोस्टर्स लावण्यात आले आहेत. शरद पवार यांचे पावसात भिजतानाचे फोटोही या पोस्टर्सवर लावण्यात आले आहेत. होर्डिंग्सजवर मजकूरही लिहिण्यात आला आहे. बाप तो बाप रहेगा… असं या पोस्टर्स आणि होर्डिंग्जवर लिहिण्यात आलं असून एक प्रकारे अजितदादांना डिवचण्याचं कामच करण्यात आलं आहे.

देशभरात परवा 7 तारखेला लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. आज संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात सुद्धा तिसऱ्या टप्प्याच मतदान होणार आहे. या लोकसभा मतदार संघात अत्यंत चुरशीची लढत होणार आहे. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे या जरी निवडणुकीच्या रिंगणात असल्या तरी खरी लढाई ही बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी असणार आहे. आज सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा ही बारामतीमधील मिशन हायस्कूलच्या मैदानात पार पडत आहे. या सभेची तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांचीही सभा आज बारामतीत होणार आहे. या सभेचीही पूर्ण तयारी करण्यात आली आहे.

sharad pawar

sharad pawar

पवारांच्या सभेत बॅनरबाजीवर अधिक भर देण्यात आला आहे. शरद पवारांच्या सभेच्या ठिकाणी बाप तो बाप रहेगा… असा मजकूर लिहून बॅनरबाजी करण्यात आली आहे. या सभेत साताऱ्यातील सभेतील शरद पवार यांचे पावसात भिजून भाषण करतानाचा फोटोही लावण्यात आले आहेत.

बॅनर्सवरील मजकूर काय?

वाऱ्यासोबत उडून चाललेल्या

पालापाचोळ्याची फिकीर नाही,

इथे नव्या पालवीला जन्म

घालणारा महावृक्ष आहे…

sharad pawar

sharad pawar

लय भारी भारी लोकांना सरळ

करण्याची माझ्यात ताकद आहे

sharad pawar

sharad pawar

बाप तो बाप रहेगा

sharad pawar

sharad pawar

शरद पवार यांचे अस्तित्व संपवू पाहणाऱ्या

घर फोडणाऱ्या, भाजपला बारामतीकर साथ देणार की लाथ मारणार?

sharad pawar

sharad pawar

वोह तुफां है, वोह आँधी है

नाम शरद पवार है!

sharad pawar

sharad pawar

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.