
शरद पवार यांच्या मुलाखतीने महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. शरद पवार यांनी देशातील प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, अशी भविष्यवाणी केली आहे. तसेच आमची आणि उद्धव ठाकरे यांची विचारधारा सारखीच आहे. ते समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्याबाबत सकारात्मक आहे. मी त्यांची विचारसरणी पाहिली आहे, असे म्हटले आहे. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर भाजपने उद्धव ठाकरे यांना घेरण्याची तयारी सुरु केली आहे. शरद पवार यांच्या वक्तव्यावर महायुतीचे समन्वयक आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना उबाठावर हल्ला केला आहे. त्यांनी उद्धव ठाकरे गटाला काही प्रश्न विचारले असून, ‘उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी’ अशी अवस्था उद्धव ठाकरे गटाची झाली असल्याचे म्हटले आहे.
यावेळी आमदार लाड म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांना विरोध करणाऱ्या काँग्रेसला धरले! माझ्या तमाम हिंदू बांधवांनो … म्हणणे सोडले! काँग्रेसच्या म्हणण्यानुसार लांगूलचालन सुरु केले आहे. उबाठा गट आता कॉंग्रेसमध्ये विलीन होणार का? उद्धव ठाकरे यांची गत ‘उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी’ (अर्थ-प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो) अशी झालीय.
वीर सावरकरांना विरोध करणाऱ्या कॉंग्रेसला धरले!
माझ्या तमाम हिंदू बांधवांनो … म्हणणे सोडले!
कॉंग्रेसच्या म्हणण्यानुसार लांगूलचालन सुरु केले!
उबाठा गट आता कॉंग्रेसमध्ये विलीन होणार का?उद्धव ठाकरे यांची गत
'उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी'
(अर्थ-प्रत्येक मनुष्य आपल्या… pic.twitter.com/hjFKsn5DYX— Prasad Lad (Modi ka Parivar) (@PrasadLadInd) May 8, 2024
शरद पवार यांच्या म्हणण्यानुसार, समान विचारधारेचा छोटा प्रादेशिक पक्ष उबाठा गट पण काँग्रेसमध्ये विलीन होणार का? काँग्रेस सरकारच्या काळात देशावर झालेले विविध हल्ले, विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी २६/११ च्या हल्ल्याबद्दल केलेला देश विरोधी दावा आणि काँग्रेसचा राम मंदिराला असलेला विरोध!, हे सर्व उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? अशा काँग्रेसी विचारधारेला भाजपचा कायमच विरोध असेल. परंतु उद्धव ठाकरे यांना हे सर्व मान्य आहे का?” असा प्रश्न आमदार प्रसाद लाड यांनी उपस्थित केला आहे.
महायुतीचे समन्वयक आमदार लाड यांनी उबाठा गटाला हे प्रश्न विचारले असून, शरद पवार यांच्या म्हणण्यानुसार समान विचारधारेचे पक्ष अथवा उद्धव ठाकरे गट यांचा उबाठा गट देखील कॉंग्रेसमध्ये विलीन होणार का? हे येणारा काळच ठरवेल!