AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : 15 दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार?; शरद पवार म्हणतात, ‘निव्वळ अशक्य’

Sharad Pawar : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वबळावर लढणार याबाबत पवार यांना विचारण्यात आले.

Sharad Pawar : 15 दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार?; शरद पवार म्हणतात, 'निव्वळ अशक्य'
15 दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार?; शरद पवार म्हणतात, 'निव्वळ अशक्य' Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 10, 2022 | 12:08 PM
Share

कोल्हापूर: सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या 15 दिवसात राज्यात निवडणुका लागणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यानुषंगाने इच्छूकांनी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी निवडणुकीवरून सुरू असलेल्या अफवांवर भाष्य केलं आहे. येत्या 15 दिवसात निवडणुका (election) होणार नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलं आहे. तसेच या निवडणुका 15 दिवसात का होणार नाहीत? कोर्टाचा नेमका निर्णय काय आणि त्याचा काय अर्थ काय हे सुद्धा पवारांनी स्पष्ट केलं. पवारांच्या या विधानामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोल्हापुरात पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.

सुप्रीम कोर्टाने 15 दिवसांत निवडणुका घ्यायला सांगितल्याचा गैरसमज आहे. ज्या स्टेजला निवडणूक थांबवली, तिथपासून तुम्ही निवडणूक सुरु करा, असं कोर्टानं म्हटलंय. निवडणुकी संदर्भात हरकती मागवल्या तर त्याला एक महिना लागतो. वॉर्ड तयार झाल्यानंतर त्याला महिना लागतो. दोन अडीच, तीन महिने प्रक्रियेसाठी लागणारच आहे. पंधरा दिवसात निवडणुका घेण्यासाठीची प्रक्रिया सुरु करा, असं कोर्ट म्हणतंय. निवडणुका घ्या असं म्हणत नाहीये, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

आमच्याच पक्षात एकमत नाही

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वबळावर लढणार याबाबत पवार यांना विचारण्यात आले. त्यावर बोलताना एकत्रित निवडणूक लढवण्याबाबत आपल्याच पक्षात एकमत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. निवडणुका एकत्र लढवाव्यात की नाही यावर अजून काही फारशी चर्चा झालेली नाही. माझ्या पक्षात त्यावर चर्चा झाली. माझ्या पक्षात यावरून दोन मतं आहे. काहींचं मत आहे, प्रत्येकांनं आपआपल्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवावी आणि निवडणूक झाल्यानंतर त्यावर एकत्रित बसावं. काहींना वाटतं की आपण सरकार एकत्र चालवतो, त्यामुळे आपण एकत्रित निवडणूक लढवली तर ते सरकारसाठीही चांगलं राहील. पण याच्यात अजून अंतिम निर्णय झालेला नाही, असं पवार म्हणाले.

तर जाहीरपणे बोलेन

बाकीच्या दोन पक्षांची निवडणुकीबाबत काय भूमिका आहे याची मला माहिती नाही. त्यामुळे यावर थेट वक्तव्य करणं योग्य नाही. एकमेकांची मतं समजल्यानंतर जाहीरपणे बोलेन, असं सांगत पवारांनी यावर अधिक भाष्य केलं नाही.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.