AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : अंबानींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अवतार पुरुष म्हटलं, त्यावर शरद पवार म्हणाले की…

Sharad Pawar : "आमची चर्चा झालेली नाही. मी मुंबईत नाहीय. आम्ही बसून याचा निर्णय घेऊ. निर्णय़ घेऊ तो सगळीकडे सारखा असेलच असं नाही. विधानसभेला एकत्र गेलो, तसं सगळीकडे एकत्र जाऊ असं वाटत नाही. ठाकरे बंधु एकत्र आले, मविआची शक्ती वाढली तर आम्हाला आनंदच आहे"

Sharad Pawar : अंबानींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अवतार पुरुष म्हटलं, त्यावर शरद पवार म्हणाले की...
Sharad Pawar
| Updated on: Sep 18, 2025 | 9:41 AM
Share

अंबानी यांनी असं स्टेटमेंट केलं की, नरेंद्र मोदी हे अवतार आहेत, देशाचा 100 वा स्वातंत्र्यदिन साजरा करु तो पर्यंत ते पंतप्रधान असावेत असं स्टेटमेंट केलं. त्यावर आज शरद पवार यांना पत्रकारांनी विचारलं. “पंतप्रधान ७५ व्या वर्षात पदार्पण करतायत याच अभिनंदन, समाधान वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक करतात. मी त्यांना पत्र लिहिलं, टि्वट केलं त्यांचं अभिनंदन केलं. अशा प्रसंगी कुठलही राजकारण न आणता संस्कृतपणाचा दर्शन दाखवल पाहिजे. देशातील किंवा देशाबाहेरच्या नेतृत्वाने पीएमच अभिनंदन केलं. त्यामुळे मी त्यावर भाष्य करुन इच्छित नाही. माझ्या 75 व्या वाढदिवसाला मोदी स्वतला आले होते. देशासाठी काय करायच असेल तर त्यांनी कराव एवढीच अपेक्षा” असं शरद पवार म्हणाले. 75 व्या वर्षानंतर संवैधानिक पदावर थांबावं असा सूर आहे. त्यावर शरद पवार म्हणाले की, ‘आता मी थांबलो नाही, त्यामुळे मला बोलायचा नैतिक अधिकार नाही’

मोदीचा वाढदिवस साजरा झाला. कालच्या पेपरमध्ये शिंदेची जाहीरात पहिल्या पानावर दिसली. भाजपवर कुरघोडी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का?. “पेपरच्या काही समस्या असतात. संबंध पान जाहीरात मिळाली तर आनंद असतो. शिंदे साहेबांनी मोदींबद्दल आत्मीयता दाखवली” असं उत्तर शरद पवारांनी दिलं. “आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली, शेतीच नुकसान झालय, शेतकरी संकटात आहे. सोयाबीन पीक उद्धवस्त झालय. देवाभाऊंनी या सगळ्याकडे लक्ष दिलं पाहिजे” असं शरद पवार म्हणाले.

ठाकरेंच्या एकत्र येण्यावर शरद पवार काय म्हणाले?

उद्धव ठकारे आणि राज ठाकरे महापालिका निवडणुकीसाठी एकत्र येत आहेत. या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, “आमची चर्चा झालेली नाही. मी मुंबईत नाहीय. आम्ही बसून याचा निर्णय घेऊ. निर्णय़ घेऊ तो सगळीकडे सारखा असेलच असं नाही. विधानसभेला एकत्र गेलो, तसं सगळीकडे एकत्र जाऊ असं वाटत नाही. ते एकत्र आले, मविआची शक्ती वाढली तर आम्हाला आनंदच आहे”

‘हैदराबाद गॅझेटचा दृष्टीकोन यापूर्वी माहित नव्हता’

मराठा आरक्षण, हैदराबाद गॅझेटच्या अमंलबजावणीला छगन भुजबळ विरोध करत आहेत, ओबीसींना एकत्र करण्याचा प्रयत्न भुजबळांकडून होतोय, या प्रश्नावर शरद पवार यांनी उत्तर दिलं. “हैदराबाद गॅझेट एक दिशा दाखवत. मला स्वत:ला हैदराबाद गॅझेटचा दृष्टीकोन यापूर्वी माहित नव्हता. त्याची कॉपी मला हल्ली मिळाली. त्याचा आधार महाराष्ट्र सरकारने घेतलाय. मला याच्यात दोन गोष्टी विचार करायला लावतात. हा प्रश्न सोडवताना सामंजस्य रहावं, आपल्यातील एकीची वीण उसवू नये ही भावना सर्वाची असणार, त्याच्यात काही वाद नाही. सुसंवाद साधला पाहिजे. भुजबळ असो वा मुख्यमंत्री त्यांच्यात सुसंवाद साधून सामंजस्य महाराष्ट्रात कसं राहील याची काळजी घेण्याची गरज आहे. गावागावात कटुता, संघर्ष महाराष्ट्राच्या दृष्टीने घातक आहे” असं शरद पवार म्हणाले.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.