AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेकडून कोल्हापुरात ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स, जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

कोरोनाच्या संकट काळात मदतीसाठी पुढे आलेल्या सेवाभावी संस्थांच्या कार्याला बळकटी देण्यासाठी उपयोगी वस्तू आणि आर्थिक स्वरूपात मदत करून आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे.

आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेकडून कोल्हापुरात ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स, जीवनावश्यक वस्तूंचे वितरण
| Edited By: | Updated on: Jun 13, 2021 | 4:46 PM
Share

कोल्हापूर : राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. कोरोनाच्या संकट काळात मदतीसाठी पुढे आलेल्या सेवाभावी संस्थांच्या कार्याला बळकटी देण्यासाठी उपयोगी वस्तू आणि आर्थिक स्वरूपात मदत करून हा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जात आहे. (Shiv Sena distributes oxygen concentrators in Kolhapur on occasion of Aditya Thackeray birthday)

याबाबत बोलतना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले की, आदित्य ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जनसामन्यांचे नेतृत्व करण्याचे बाळकडू मिळाले आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांचे दर्शन वेळोवेळी होत आहे. पर्यावरण मंत्री म्हणून काम करत असताना त्यांच्यामार्फत राज्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांवरून त्यांच्या अभ्यासू आणि कृतीशील व्यक्तिमत्वाचे दर्शन घडते. अशा नेतृत्वाला सामाजिक उपक्रमातून शुभेच्छा देणे ही शिवसैनिक आणि युवासैनिकांसाठी पर्वणी आहे. कोरोना काळात अनेक सेवाभावी संस्था काम करत असून त्यांच्या कार्याला बळकटी देणे आपली जबाबदारी आहे. यातूनच केलेल्या आवाहनास दाद देत मेनन बेअरिंग कंपनीचे चेअरमन नितीन मेनन यांनी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर उपलब्ध करून दिले. आज आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर गरजू आणि सेवाभावी संस्थांना वितरित केले.

शिवसेना शहर कार्यालय येथे सकाळी शिवसेना आणि मेनन इंडस्ट्रीज यांच्यावतीने 5 लाखांचे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर आणि एक हजार गरजू नागरिकांना 10 लाखांच्या जीवनावश्यक वस्तूंचे किट प्रदान करण्याचा सोहळा पार पडला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात मोफत ऑक्सिजन सेवा राबविणाऱ्या मणेर मस्जिद ट्रस्टला दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर प्रदान करण्यात आले.

कोव्हिड सेंटर्सना आर्थिक मदत

कोरोना काळात माणुसकीच्या नात्याने कार्यरत असणाऱ्या सेवाभावी संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरला आर्थिक स्वरूपात मदत जाहीर करण्यात आली. त्याचबरोबर गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप करण्यात आले. यानंतर सेवाभावी संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरला युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मदतीचे धनादेश प्रदान केले. यामध्ये गांधी मैदान येथील कै. विष्णुपंत इंगवले कोव्हिड सेंटरला 1 लाख रुपये, दिगंबर जैन बोर्डिंग येथील व्हाईट आर्मीच्या कोव्हिड सेंटरला 50 हजार रुपये आणि व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या संताजी घोरपडे मोफत कोव्हिड सेंटरला 50 हजार रुपये अशी मदत करण्यात आली.

शिवसेना-युवासेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

यावेळी शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, माजी नगरसेवक राजू हुंबे, मेनन कंपनीचे विकास पाटील, पानपट्टी सेनेचे जिल्हाध्यक्ष अरुण सावंत, शिवसेना उपशहरप्रमुख सुनील जाधव, रमेश खाडे, जयवंत हारुगले, रणजीत जाधव, तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, निलेश हंकारे, अभिषेक देवणे, रियाज बागवान, अंकुश निपाणीकर, साहिल बागवान, रणजीत मिणचेकर, राज अर्जुनिकर, विशाल पाटील, मणेर मस्जिद ट्रस्टचे हिदायत मणेर, शफिक मणेर, इम्रान मणेर, मेहबूब नदाफ, शकील पटवेगार, हमीद मणेर, गवळी समाजाचे बबन गवळी, युवा सेनेचे सौरभ कुलकर्णी, आदर्श जाधव आदी शिवसेना, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त 1 हजार युवासेना पदाधिकाऱ्यांचे मोफत लसीकरण

1.35 कोटी खर्चून मुंबईतील दोन उद्यानांचं सुशोभिकरण, आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त रविवारी भूमिपूजन

(Shiv Sena distributes oxygen concentrators in Kolhapur on occasion of Aditya Thackeray birthday)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.